शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णकन्येचे बेला येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:00 IST

जिल्ह्याची कन्या आणि बेला येथील रहिवासी मयुरी धनराज लुटे हिने दिल्लीत पार पडलेल्या एशियाई स्पर्धेत ट्रॅक सायकलींगमध्ये दोन सुवर्ण पदक पटकाविले. सोमवारी सायंकाळी तिचे बेला गावात आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देएशियाई स्पर्धा : मयुरी लुटे हिने पटकाविले दोन सुवर्ण पदक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची कन्या आणि बेला येथील रहिवासी मयुरी धनराज लुटे हिने दिल्लीत पार पडलेल्या एशियाई स्पर्धेत ट्रॅक सायकलींगमध्ये दोन सुवर्ण पदक पटकाविले. सोमवारी सायंकाळी तिचे बेला गावात आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील बेला येथील मयुरी लुटे सहभागी झाली होती. शहरी स्पर्धकांना मागे टाकत तिने या स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकाविले. सोमवारी दिल्लीहून नागपूरला विमानाने आणि तिथून ती एका वाहनाने बेला येथे दाखल झाली. आपल्या गावच्या सुवर्णकन्येचे स्वागत करण्यासाठी बेला गावकरी सज्ज होते. जिल्हा परिषद शाळेजवळ मयुरी पोहचताच ढोलताशाच्या गजरात तिचे जल्लोषात स्वागत करुन गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच पुजा ठवकर, गणेश ठवकर, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, यशवंत सोनकुसरे उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता निमजे व शिक्षकांनी तिचे स्वागत केले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, सरपंच पुजा ठवकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, धनराज साठवणे, प्रविण उदापुरे, जयश्री बोरकर, पांडुरंग खाटीक, ललीत बेंदरे, विश्वजित घरडे, दर्शन जोन्दे, संजु मते, उपसरपंच मंगला पुडके यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मयुरी लुटे, सुनिता लुटे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार उमेश मोहतुरे यांनी मानले. मयुरीने मिळविलेल्या या यशाने सर्व गावकºयांची मान उंचाविली होती.