शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
4
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
5
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
6
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
7
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
8
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
9
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
10
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
11
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
12
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
13
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
14
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
15
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
16
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
17
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
18
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
19
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
20
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!

प्रवाशांचे ‘फूल’ देऊन होणार स्वागत

By admin | Updated: June 1, 2015 01:07 IST

सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जून ला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत.

शिवशंकर बावनकुळे साकोली सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जून ला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने होणाऱ्या परिवहन दिनासाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आपल्या आगारामध्ये विविध उपक्रम जाहीर केले आहेत. या उपक्रमांमध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी प्रत्येक प्रवाशाचे फूल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. जेणे करून या दिवसाचे आगळेवेगळे स्वरुप प्रवाशांना जाणवले पाहिजे.परिवहन दिनाचे औचित्यसाधून एसटीच्या ताफ्यातील सर्व बसगाड्या आतून आणि बाहेरून साफ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवास आल्हाददायक वाटेल. त्याचप्रमाणे एसटीची सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुशोभीत करण्यात येणार आहेत. याच दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे स्वागत करण्यात येईल. वर्धापन दिन हा परिवहन दिन म्हणून साजरा करण्याबाबत सर्व आगारांना याचे परिपत्रक पाठविण्यात आले.स्वातंत्र्यानंतर काही महिन्यातच अहमदनगर पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली होती. तेव्हापासून हा दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा केल जातो. मात्र गेल्या वर्षीपासून हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा एसटी महामंडळाने सुरु केली.या दिवशी एसटीचे कर्मचारी आणि प्रवाशी यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येऊन अनेक कार्यक्रम आखले आहेत. महामंडळाच्या राज्यभरातील २५० आगारामध्ये हे कार्यक्रम दिवसभर होतील. आगारात उत्तम कामगिरी करणारे चालक, वाहक यांत्रिक विभागातील कर्मचारी यांचाही सत्कार प्रत्येक आगारात करण्यात येईल. विशेष म्हणजे या दिवशी एसटीचे अधिकारी प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.