कोंढा (कोसरा) : अत्यल्प पाण्यामुळे धान निसवण्याच्या तयारीत आहे. धान पीक एका पाण्याने जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. कोंढा परिसरात गोसे प्रकल्पाचा डावा कालवा आहे. त्यामुळे कालव्याच्या आजूबाजूची शेती पाणी सोडल्याने विकणार आहे. पण पाण्याची सुविधा नसलेली चुऱ्हाड, पिंपळगाव (नि.), पालोरा (चौ.), कोसरा, कोंढा शिवारातील शेती एका पाण्याने जाण्याच्या स्थितीमध्ये आहे. सध्या दररोज सूर्य आग ओकत आहे. ३५ सेल्सीयसपेक्षा जास्त तापमान आहे. म्हणून धानाच्या शेतातील पाणी आटले. जागोजागी शेतात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. शेतकरी विद्युत पंपद्वारे विहीर असल्यास पाणी उपसते. सध्या भारनियमन वाढले आहे. दररोज आठ तासांचे भारनियमन सुरु आहे. तसेच केव्हाही वीज जाण्याचे प्रकार वाढले आहे. शेतकऱ्यांनी इकडून तिकडून अर्ज काढून धानाचे पीक लावले आहे. आजघडीला एका पाण्याची गरज आहे. परंतु मागील १५ दिवसांपासून उकाडा सुरू असल्यामुळे धानपिकावर किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. (वार्ताहर)
भारनियमनाने धानपीक धोक्यात
By admin | Updated: October 8, 2014 23:21 IST