शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाने धान पिकाला धोका

By admin | Updated: August 7, 2016 00:24 IST

लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा व परिसरात विद्युत भारनियमनामुळे कृषीपंपधारक शेतकरी धान उत्पन्नापासून वंचित राहण्याची भीती आहे.

शेतकऱ्यांमध्ये असंतोष : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचा पुढाकारलाखनी / सालेभाटा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा व परिसरात विद्युत भारनियमनामुळे कृषीपंपधारक शेतकरी धान उत्पन्नापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने याविरूध्द एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांची धान रोवणी अजूनही खोळंबलेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात बोअरवेल्सची सोय केली. दोन महिने लोटून गेली तरी परिसरातील गोंडसावरी, रेंगेपार कोठा, दैतमांगली, राजेगाव, मोरगाव, केसलवाडा पवार, चिखलाबोडी, परसोडी, सोमलवाडा, मेंढा आदी गावात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.वीज वितरण कंपनीने १६ तास भारनियमन केल्याने केवळ आठ तासात शेतकऱ्यांची तहान भागत नाही. भरनियमनाचे वेळापत्रकही शेतकऱ्यांची झोप उडविणारे असल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. रब्बी पीक घेवून डोक्यावरील कर्जाचा बोझा कमी होईल या आशेने कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी कंबर कसली होती. परंतु विद्युत वितरण कंपनीच्या तघुलकी धोरणाचा अखेर शेतकऱ्यांनाच फटका बसला. परिसरात २४ तास विद्युत पुरवठा चालू राहणे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना रेंगेपार कोठा यांनी विद्युत भारनियमनाविरूद्ध बंड पुकारले आहे. परिसरात २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. परंतु त्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे दिसून येत आहे. १६ आॅगस्टपर्यंत १६ तासाचे विद्युत भारनियमन बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा माणिक टिचकुले, मोहन बुराडे, मोरेश्वर भूते, रतिराम हजारे, श्रीहरी पिंपळशेंडे, तेजराम चोपकर, विनोद रोटके, नंदलाल काटगाये आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी) /वार्ताहर)भारनियमनाने जनता त्रस्तपावसाळ्याचे दिवस सुरु असतानाही जिल्ह्यात शहरी तथा ग्रामीण भागात भारनियमनाचा बडगा उगारण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सिंचनाची व्यवस्था होत नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. तर या भारनियमनामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळेस श्वापदांमुळे जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.