शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील आठवडी बाजार धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:51 IST

तालुक्यातील लाखनी शहराचा आठवडी बाजार मंगळवारला भरत असतो. लक्षावधी रूपयांची उलाढाल असणारा लाखनीचा आठवडी बाजार सोमलवाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजार जागेत भरायचा.

ठळक मुद्देलाखनीत अपघाताची शक्यता : बाजार स्थलांतरित करणे महत्त्वपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील लाखनी शहराचा आठवडी बाजार मंगळवारला भरत असतो. लक्षावधी रूपयांची उलाढाल असणारा लाखनीचा आठवडी बाजार सोमलवाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजार जागेत भरायचा.बाजाराची वाढती व्याप्ती व जनतेच्या सुविधा व सोयीसाठी काही किरकोळ विक्रेत्यांनी भाजीबाजार राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आणला आहे. तहसिल कार्यालय परिसर पासून ते शिवाजी चौकापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर बाजार एका बाजुला विस्तारलेला आहे. भाजीबाजारामुळे लाखनी शहरातील सर्व्हिस मार्गावर प्रचंड गर्दी असते. लोकांची वाहने राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर ठेवलेली असतात.लाखनी शहरात अनियंत्रीत ट्रकमुळे पाच व्यक्तींचा बळी गेला तर अनेक वाहनाचा चुराडा झाला. अशाप्रकारची घटना लाखनी शहरात केव्हाही घडू शकते. अनियंत्रित ट्रक व अवजड वाहने बाजारात घुसली तर अनेक लोकांचे हकनाक प्राण जातील. अपघाताच्या व गंभीर दुखापतीच्या घटना घडू शकतात.या टाळण्यासाठी अशोका बिल्डकॉन व कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे प्रयत्न करण्यात आले होते. भाजीबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यॉर्डात स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आठवड्यातून दोनदा भाजीबाजार भरविण्याचा प्रयत्न बाजार समितीकडून करण्यात आला. त्यालाही यश मिळाले नाही.भाजीविक्रेतेने राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून बाजार हटविण्यास विरोध करतात. अशोक बिल्डकॉन व पोलीस विभागाने राष्ट्रीय महामार्गावरील बाजार हलविण्याचा प्रयत्न केला. जुनी बाजाराची जागा ओस पडत आहेत.एकाच कुटुंबातील भाजीव्रिकेते दोन दोन ठिकाणी दुकाने लावतात. भाजीविक्रेत्यांना जनतेच्या जीवाची कोणतीही काळजी नाही. आठवडी बाजार मंगळवारला मोठी दुर्घटना घडू शकते ते टाळण्यासाठी सर्व्हिस रोडवरील बाजार हलविणे महत्वाचे आहे.सोमलवाडा मार्गावर जुन्या गुरांच्या बाजारात जागा आहे. मुख्य बाजाराची जागा ओस पडून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडचा बाजार वाढला आहे.गर्दीचा फायदा चोरटे घेतानी दिसून येतात. मोबाईल व दागिने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षित बाजाराचे स्थळ ही जनतेची गरज बनली आहे. अनेक गैरसोय असलेला बाजार लाखनी शहराचा आहे तसेच मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी असते.