शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

विकेंड लाॅकडाऊन कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 5:00 AM

पाेलिसांनी भंडारा शहरात राजीव गांधी चाैक, खांबतलाव, नगरपरिषद, त्रिमूर्ती चाैक, बसस्थानक, लालबहादूर शास्त्री चाैक बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली हाेती. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चाैकशी केली जात हाेती. महत्त्वाचे काम असले तरच जाऊ दिले जात हाेते, अन्यथा तंबी देऊन घरी पाठविले जात हाेते. अनेक चाैकात पाेलीस तैनात करण्यात आले हाेते. ग्रामीण भागातही या लाॅकडाऊनला जनतेचा चांगलाच प्रतिसात मिळाला. करडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्देरस्त्यावर तुरळक गर्दी : पाेलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्ह्यात कठाेर निर्बंध लावले जात असून, त्याअंतर्गत शुक्रवार रात्रीपासून वीकेंड लाॅकडाऊन करण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही या लाॅकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येकाची चाैकशी सुरू केली हाेती. त्यामुळे भंडारा शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसत हाेते. एसटी बस सुरू असल्याने बसस्थानक परिसरात तुरळक गर्दी दिसत हाेती. कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडत नसल्याचे चित्र दिवसभर हाेते. भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. दरराेज हजारावर काेराेनाबाधित आढळून येत आहे, तर मृतांची संख्याही वाढत आहे. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध घालून दिले आहेत. त्याअंतर्गत शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून जिल्ह्यात वीकेंड लाॅकडाऊन घाेषित करण्यात आला. शनिवारी सकाळी रस्त्यावर काही ठिकाणी नागरिकांची वर्दळ दिसत हाेती. पाेलिसांनी शहरभर गस्त घालून नागरिकांना सूचना दिल्या. त्यामुळे टपऱ्या व काही किराणा दुकाने बंद करण्यात आली. पाेलिसांनी भंडारा शहरात राजीव गांधी चाैक, खांबतलाव, नगरपरिषद, त्रिमूर्ती चाैक, बसस्थानक, लालबहादूर शास्त्री चाैक बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली हाेती. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची चाैकशी केली जात हाेती. महत्त्वाचे काम असले तरच जाऊ दिले जात हाेते, अन्यथा तंबी देऊन घरी पाठविले जात हाेते. अनेक चाैकात पाेलीस तैनात करण्यात आले हाेते. ग्रामीण भागातही या लाॅकडाऊनला जनतेचा चांगलाच प्रतिसात मिळाला. करडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.वीकेंड लाॅकडाऊन असला तरी एसटी बस मात्र सुरू हाेती. त्यामुळे बसस्थानकावर काहीअंशी प्रवाशांची गर्दी दिसत हाेती. नियमित असणारे एसटीचे शेडूल शनिवारी कमी करण्यात आले हाेते. भंडारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी लाॅकडाऊनला प्रतिसाद मिळाला. साकाेली पवनी, लाखनी, लाखांदूर, माेहाडी, तुमसर येथेही व्यापारी आणि नागरिकांनी बंद पाडून प्रशासनाला सहकार्य केले. 

राष्ट्रीय महामार्गावर पाेलिसांची करडी नजर भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दिवसभर पाेलिसांची करडी नजर हाेती. भंडारा लगतच्या धारगाव येथे पाेलिसांनी दुचाकीस्वारांना थांबवून त्यांची चाैकशी सुरू केली हाेती. येणाऱ्या प्रत्येकाला तंबीही दिली जात हाेती. पाेलीस केवळ दुचाकी चालकांचीच चाैकशी करीत असल्याचे दिसत हाेते. सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहनशनिवारी पहिल्या दिवशी वीकेंड लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा लाॅकडाऊन दाेन दिवसांचा असून, रविवारीसुद्धा नागरिकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. नगरपरिषदेचे पथक शहरभर गस्त घालून नागरिकांना सूचना देत हाेते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या