शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अतांत्रिक व्यक्तीकडून हवामान केंद्राच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:43 IST

तालुक्यातील महालगाव बपेरा शिवारात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या हवामान केंद्रातील नोंदी अतांत्रिक इसमाकडून घेतल्या जात आहेत. येथील यंत्र सामूग्री बेवारस असून लाखो रुपयांचे शासकीय निवासस्थाने रिकामे पडले आहेत.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग : महालगावच्या केंद्राला झाडाझुडपांचा विळखा, निवासस्थानेही रिकामे

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील महालगाव बपेरा शिवारात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या हवामान केंद्रातील नोंदी अतांत्रिक इसमाकडून घेतल्या जात आहेत. येथील यंत्र सामूग्री बेवारस असून लाखो रुपयांचे शासकीय निवासस्थाने रिकामे पडले आहेत. विशेष म्हणजे संबंधित विभागातील कर्मचारी अधिकारी नागपूर येथे वास्तव्यास असल्याने हा प्रकार सुरु आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे. आता अतांत्रिक व्यक्ती हवामान केंद्रातील नोंदी घेत असल्याचे महालगाव बपेरा येथे उघडकीस आले. शासनाच्या पाटबंधारे विभागांतर्गत जलसंपदा उपविभाग क्रमांक ४ अंतर्गत महालगाव येथे हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली. येथे स्वयंचलित व साधे पर्जन्यमापक, पवन वेगमापक, सूर्यप्रकाश तीव्रता मापक, कमाल व किमान तापमापक, दिशादर्शक उपकरण, बाष्पीभवन उपकरण बसविण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाºयांसाठी निवासस्थानेही बांधण्यात आली. परंतु संबंधित विभागाचे कर्मचारी येथे राहत नाही. त्यामुळे हवामान केंद्र जंगलमय झाले आहे. दरदिवशी पर्जन्यमापनाची नोंद येथे घेतली जाते. परंतु येथील कर्मचारी नागपुरला वास्तव्यास असल्याने अतांत्रिक व्यक्तीकडून नोंद घेतली जात असल्याची माहिती आहे. तो किती शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद घेत असेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. राज्य शासनाने लाखो रुपये खर्च केलेली ही यंत्रणा आता धुळखात पडली आहे. केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडले जातात. हवामानाचा अंदाज बेजबाबदारपणे घेण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. योग्य कारवाई झाली नाही तर कुलूप ठोकण्याचा इशारा युवक काँग्रेसचे नेते डॉ.पंकज कारेमोरे यांनी दिला.येथील कर्मचाºयाचे पद रिक्त आहे. तेथील एका कर्मचाºयाकडे प्रभार दिला आहे. यापेक्षा जास्त काहीही सांगू शकत नाही.- के.एम. डाकवाले,जलसंपदा विभाग नागपूर