शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस संरक्षणाशिवाय आम्ही काम करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

लाखनी येथील आशा वर्कर कोरोना संबंधित माहिती घेण्यासाठी गेल्या असता एका कुटुंबियाने आशा वर्करला नगर पंचायत प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रूपये मिळतात व त्यात आशा वर्करचा हिस्सा असतो, असे चुकीचे आरोप करीत भांडण केले. एवढेच नव्हे तर मारण्याची धमकी दिली आहे.

ठळक मुद्देलाखनी तहसीलदारांना संघटनेचे निवेदन, आशा वर्करला धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शहरात एकाच प्रवर्गातील १९ कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहे. मात्र तपासणीसाठी गेलेल्या आशा वर्करशी भांडण करून एकाने मारण्याची धमकी दिल्याने आशा वर्कर धास्तावल्या आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस संरक्षण मिळाल्याशिवाय काम करणार असा इशारा आशा वर्कर संघटनेने तहसीलदारांदिलेल्या निवेदनातून दिला आहे.लाखनी येथील आशा वर्कर कोरोना संबंधित माहिती घेण्यासाठी गेल्या असता एका कुटुंबियाने आशा वर्करला नगर पंचायत प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रूपये मिळतात व त्यात आशा वर्करचा हिस्सा असतो, असे चुकीचे आरोप करीत भांडण केले. एवढेच नव्हे तर मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आशा वर्कर संघटनेने तहसीलदारांना पोलीस संरक्षण तसेच आरोग्य विभागाचा चमू सोबत असल्याशिवाय आम्ही कोरोनाचे ेकामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले आहे.तालुक्यात असा प्रसंग पुन्हा उद्भवण्याची शक्यता असल्याने आमचा जीव धोक्यात असून कोरोना सर्वेक्षण तसेच इतर कामांसाठी आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कार्याशी संबंधित विभागाचा चमू तयार करून त्या चमूद्वारे सर्व कामे करावायाचा शासनाचा आदेश आहे. मात्र प्रत्यक्षात ही सर्व कामे आशा वर्ककडूनच करून घेतली जात आहेत. त्यामुळे आशा वर्कर कर्मचाऱ्यांना कमी मानधनासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देवून समस्या सोडविण्याची मागणी आयटकप्रणित आशा वर्कर संघटनेने केली आहे.शिष्टमंडळ एकवटलेआशा वर्कर जीव मुठीत घेवून कोरोना योद्धाचे काम करत असताना समाजातील काही जण सहकार्य न करता त्रास देत आहेत.यासाठी आशा वर्कर संघटनेतर्फे तहसीलदारांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आयटकचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर, भुमिका वंजारी, वनिता निर्वाण, नंदा चवळे, आशा धांडे, महानंदा रामटेके, श्यामली गिरीपुंजे, अनिता साठवणे, अर्चना भैसारे, तारा मोटघरे, मीना लारोकर, माया धरमशहारे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते कामे करताना येत असलेल्या समस्या मांडण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या