शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही दंड भरणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:14 IST

‘गाळ मुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ यात बेला ग्रामपंचायत अडकली आहेत.

ठळक मुद्देबेला सरपंचांचा निर्धार : पत्रपरिषदेत प्रशासनावर गंभीर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘गाळ मुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ यात बेला ग्रामपंचायत अडकली आहेत. तलावातील गौण खनिजाची परस्पर विक्री केल्याचा ठपका ठेवून ग्रामपंचायतवर सुमारे २ कोटींचा दंड ठोठावला आहे. हा दंड ‘आम्ही भरणार नाही’ असा निर्धार सरपंच शारदा गायधने केला आहे.गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत राष्टÑीय महामार्गावरील बेला ग्रामपंचायत हद्दीतील लघु पाटबंधारे विभागाच्या मामा तालावातील गाळ काढण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात आला. कामाचे भूमिपूजन विभागीय आयुक्त अनुपकूमार यांच्या हस्ते केले. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, भंडारा पंचायत समितीच्या संवर्ग अधिकारी मंजुषा ठवकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकसहभागातून केलेल्या कामाला ग्रामस्थांना सहभाग मिळाला. दरम्यान तलावातून मुरुम उत्खनन करुन लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप काही पदाधिकाºयांनी व संघटनेने केला आहे. दरम्यान याची चौकशी करण्यात आली. यात ग्रामपंचायत प्रशासनाला दोषी पकडून सुमारे दोन कोटींचा दंड आकारला आहे.प्रशासनाने ठोठावलेला हा दंड ग्रामपंचायतवर अन्यायकारक आहे. जर ग्रामपंचायत यात दोषी असल्यास अधिकारीही यात तेवढेच दोषी असल्याचा आरोप यावेळी सरपंच गायधने यांनी केला. तलावातील गाळ दिवसाढवळ्या काढला. महसूल विभागाने मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी. अधिकाºयांच्या निर्देशानुसार काम झाले आहे. त्यामुळे ‘आम्ही दंड भरणार नाही’ असा निर्धार पत्रपरिषदेत गायधने यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला सरपंच अर्चना कांबळे, ग्रामपंचायत सदस्य रजनी बाभरे, धनराज घरडे, संजय भीवगडे, पुनाजी सपाटे, प्रकाश लानगे, अल्का बोरकर, शिला भिवगडे, हिरकना भिवगडे, पंचफुला मेश्राम, धनराज गाढवे, सुनिल टांगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.