शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भृूमिकेवर ठाम, विचारांशी कदापि तडजोड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:25 IST

शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड करीत नाही, असे रोकठोक प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देरामदास आठवले : तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे. शिक्षणाचे महत्व मोठे असून शिक्षणच मानवाचे रक्षण करते. यापुढे माओवाद, नक्षलवाद चालणार नाही तर केवळ आंबेडकर वाद झालेल. आंबेडकरी चळवळ पुढे घेवून जाण्याची गरज आहे. आम्ही आपल्या भुमिकेवर ठाम असून विचारांशी आम्ही कदापी तडजोड करीत नाही, असे रोकठोक प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले.इंदुताई शिक्षण संस्थेच्या वतीने तुमसर येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. सच्चिदानंद फुलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, आमदार परिणय फुके, माजी कुलसचिव पुरण मेश्राम, राजन वाघमारे, माजी कुलगुरु सुधिर मेश्राम, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र थुलकर, डॉ. मधुसुदन फुलेकर, डॉ. एन. एम. खिराडे, डॉ. अनिल हिरेखन, प्रभाकर दुपारे, डॉ. विनोद भोयर, भदंत राहुल बोधी, माजी नगराध्यक्ष गिता कोंडेवार उपस्थित होते.केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी रद्द करणे, आरक्षण रद्द करणे इत्यादी विरोधात आमची ठोस भूमिका मत्रिमंडळात मांडली. गोरगरीब दलितांचे प्रश्न सोडविताना तडजोड केली जात नाही. आम्हाला देशात आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे. शांततामय बुद्धाच्या मार्गाने जावे लागे, भीमाने इतिहास बदलविलेला, आम्हाला जयभीमचा नारा हवा, शाळा, महाविद्यालयात मानवतेचे शिक्षण देण्यावर भर दिला. असे सांगत पुन्हा देशात एनडीएचे सरकार येईल असे सांगितले. यावेळी नामदार आठवले यांनी कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी नामदार आठवले यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले.आमदार परिणय फुके व खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. सच्चिदानंद फुलेकर यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक बिसेन यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक विद्याताई फुलेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.