शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: April 12, 2016 00:35 IST

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर गोंदिया येथे आयोजित पत्रपरिषद दरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला.

आरोपींना अटक करा : गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेधभंडारा : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर गोंदिया येथे आयोजित पत्रपरिषद दरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, सोमवारला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तत्पुर्वी त्रिमूर्ती चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून जिल्हाध्यक्ष जिया पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिरलोरकर, मधुकर लिचडे, आशिष पात्रे, प्रेमसागर गणवीर, प्रसन्न चकोले, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, अजय गडकरी, शिशिर वंजारी यांच्या संयुक्त नेतृत्वात निदर्शने करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान राज्यशासनाच्या लोकशाही विरोधी कृत्याच्या विरोधात आंदोलनकर्ते घोषणा देत होते.घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून शिव शर्मा याचा स्विकृत सदस्यपद रद्द करावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रेमदास वनवे, निलकंठ (बालु) कायते, प्यारेलाल वाघमारे, चुन्नीलाल वासनिक, रेखा वासनिक, सुरेश गोन्नाडे, विनीत देशपांडे, इमरान पटेल, यशपाल कामठे, चैनलाल मस्के, अशोक बन्सोड, रोहित धकाते, भुपेंद्र इलमे, चेतन सेलोकर, नारायण मेश्राम, अयुब पटेल, सिताराम कापगते, विवेक भोयर, राजकपूर सरादे, अजय तांबे, रोहित दुर्गे, प्रदीप डोंगरे, श्रीराम अटराये, अमित उके, सुशील नगराळे, अजय तांबे, रूपलता जांभुळकर, गोविंद मेघराजानी, मोहन उके, मनोज टहिल्यानी, प्रदीप तितीरमारे, माधवराव भोयर, हमीम अकबानी, नरेश बेलेकर, भारती लिमजे, भावना शेंडे, कविता चाचेरे, चांगुणा करवाडे, ममता करवाडे, रत्नमाला मेश्राम, उपासना शेंडे, इंदू गणवीर, सुनिता खंडाते, सुनिता रोकडे, देवका मेश्राम, अनुसया नेवारे, अनिल निर्वाण, सुरेश निर्वाण, मुकूंद साखरकर, वरगंटीवार, सचिन फाले, बोरकर यांच्यासह शेकडो व कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)तुमसरात काँग्रेसचा निषेध मोर्चातुमसर : लोकलेखा समिती अध्यक्ष तथा काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक यांना तात्काळ अटक करण्याकरिता तुमसरात सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मारहान प्रकरणी काँगे्रसने निषेध व्यक्त करून तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.तुमसर-मोहाडी विधानसभा युवक काँग्रेस, तुमसर शहर काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस शहर व तालुका ओबीसी सेल, अल्पसंख्यांक सेल, सामाजिक न्याय मंच सेल, सफाई कामगार सेल, एनएसयुआय या संघटनांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांचेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करून भाजप नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.राज्यात भारतीय जनता पक्षाचे सहकार केंद्र व राज्यात आले तेव्हापासून सर्वसामान्य जनता व विरोधी पक्षाचे जनप्रतिनिधीवर हल्ले होत आहेत. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सत्तेचे दुरूपयोग करीत आहेत. यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते शहराच्या मुख्य मार्गानी भाजप सरकारच्या निषेध असो अशी घोषनेबाजी करीत तहसील कार्यालयात गेले.मोर्च्यात तुमसर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमरनाथ रगडे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सीमा भुरे, नगरसेवक प्रमोद तितीरमारे, शहर अध्यक्ष प्रकाश शहारे, राजेश चोपकर, मनोहर सिंगनजुडे, अस्मिता वाघमारे, तुमसर-मोहाडी विधानसभा युवक अध्यक्ष नीरज गौर, विजय गिरीपुंजे, राजू पाटील, योगिता बावनकर, नारायणराव तितीरमारे, गळीराम बांडेबुचे, वैशाली भवसागर, नगरसेविका लक्ष्मी कहालकर, सविता ठाकूर, नलिनी डिंकवार, उषा बिसेन, प्रफुल्ल बिसेन, अजय गौरकर, गुडविच फेड्रीक, भास्कर सार्वे, कान्हा बावनकर, सुमित चौधरी, संगम पिकलमुंडे, मुकुंद डोंगरे, पवन भोरगडे, जयंत गणेशे, शैलेश पडोळे, बाळा ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, प्रभू सरकार, शुभम गजभिये, मोहीत मेश्राम, आनंद बिसनेसह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)