शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोहार व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 20, 2015 00:31 IST

कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या लोहार-सुतार समाजावर अलिकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे.

शासनाचेही दुर्लक्ष : उपजीविका चालविण्याचा प्रश्नअड्याळ : कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या लोहार-सुतार समाजावर अलिकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे. शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे लोहार-सुतार समाजाला उपजीविका चालविणे कठीण झाले आहे.शेतकऱ्यांची शेतीकरिता उपयोगी असलेली अवजारे ही लाकडी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन अवजारे बनविण्याकरिता सुतारासोबत संबंध यायचा. लोखंडी अवजारे बनविण्याकरिता आपल्या छोट्याशा दुकानात चामडी भाता व भाता ओढण्यासाठी घरातील महिला किंवा मुलांचे सहकार्य घेत होते. दुकानामध्ये ऐरण, घन, वासला, आरी, किकरा पटास, कानस, सांडशी घेऊन लोहार आपले व्यवसाय करीत होते व या व्यवसायावरच लोहार-सुतार समाजाच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरनिवार्हाची जबाबदारी होती. यांत्रिक युगामध्ये व दिवसेंदिवस नवनवीन शोधामुळे लोहाराच्या धंद्याला अवकळा आली असून त्यांचा धंदा पावसाळ्याच्या हंगामापुरताच मर्यादित राहला. तो म्हणजे पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, वखराचा लोखंडी विळे, कुऱ्हाड, कुदळ, विळे पाजविणे एवढेच मर्यादित राहल्यामुळे व बाजारामध्ये शेतकऱ्यांची सर्व अवजारे लोखंडी व रेडीमेड मिळत असल्यामुळे लोहाराचा मुख्य धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे.पूर्वीच्या काळामध्ये शेती अवजारे व जास्तीत जास्त लाकडी राहायची आणि ती गावातीलच लोहार-सुताराकडून शेतकरी करून घ्यायची. त्यात शेतकऱ्यांचे मुख्य शेतीकरिता लागणारे वाहन म्हणजे लाकडी बैलगाडी, शेतकऱ्यांची बैलगाडी तयार करण्याकरिता सुताराला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागायचा. चाक लाकडी असल्यामुळे चाक बनविण्याकरिता सुताराला सुरवातीला चाकाचा बुदल्यामध्ये चौदा लाकडी आरे व त्या आऱ्यावर चाफला गोलाकार देण्याकरिता लाकडी जाड फडीचे पुठ्ठे, त्यावर लोखंडी येठ अशी दोन लाकडे लागायची.बैलगाडीकरीता दोन सागवान किंवा तिवसाचे झाडाचे धुरे, लाकडी तक्त्यांचा फळ, जुवाडी, खुटाडे, धुरी, मांडगे, हरणी, करवई, खोबन व त्यामध्ये लोखंडी आख व आखेमध्ये दोन चाके घालून लाकडी बैलगाडी करायची. बंडी तयार करण्याकरिता एक महिना लोहाराला मेहनत करावी लागत होती.मेहनतीकरिता लोहाराला शेतकऱ्यांकडून चांगली मिळकत व्हायची.आता यांत्रिक युगामध्ये शेतकऱ्यांची बैलगाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर असून ट्रॅक्टर, पावर ट्रिलर, लोखंडी बंडीसारखे यंत्र निघाल्यामुळे सुताराचा लाकडी औजारे बनविण्याचा व्यवसाय बंद होत आहे. खेड्यात घरकूल योजनेमुळे सिमेंटची घरे होत असल्यामुळे सुताराचा घरावरील छत बनविण्याचा धंदा बंद झाला आहे. (वार्ताहर)