८३ क्युबिक पाणी सोडले : वाघमारे यांच्या प्रयत्नाला यशलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील जनतेची तृष्णा भागविण्याकरिता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह बुधवारी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घालून पाणी विसर्ग करण्याकरिता बाध्य केले.तुमसर तालुक्यात यावर्षी भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. बावनथडीतथा वैनगंगेचे नदीपात्र कोरडे पडले आहे. मार्च महिन्यातच पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. तत्पूर्वी धान पिकाकरिता सुमारे एक महिन्यापूर्वी बावनथडी धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग केले होते. सध्या वैनगंगा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. शहरासह व तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याकरिता बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करणे एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या अनुषंगाने तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आ.चरण वाघमारे यांच्यासमोर समस्या मांडली.तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पाणी पुरवठा सभापती मेहताबसिंग ठाकुर यांनी मुंबईत आ.चरण वाघमारे यांची भेट घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्याची माहिती दिली. शहरात तीव्र जलसंकट निर्माण झाले असून बावनथडीचे पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. हीच स्थिती तालुक्याची आहे.आ.चरण वाघमारे यांनी राज्याचे जलसचिव तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणीटंचाईची सविस्तर माहिती दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांचेशी चर्चा करून बावनथडी धरणाचे पाणी विसर्ग करण्यास होकार दिला. बुधवारी सकाळी १० वाजता दुपारी ३ वाजता बावनथडी धरणातून ८३ क्युबीकचा प्रवाह दीपात्रात विसर्ग करण्यात आला. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.एस. गेडाम यांनी पाणी विसर्ग करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
By admin | Updated: May 25, 2017 00:16 IST