शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:37 IST

तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

ठळक मुद्देसोमवारी पुन्हा सोडणार पाणी : नदीकाठावरील गावांना होणार फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने मध्यप्रदेशातील ४० गावे तथा तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात जलसंकट निर्माण झाल्याने रविवारी सकाळी ११ वाजता बावनथडी (राजीवसागर) धरणातून पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी पुन्हा पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तुमसरचे आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, बालाघाटचे खासदार बोधसिंग भगत यांच्या प्रयत्नामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प बावनथडी नदीवर राजीवसागर आहे. दोन्ही राज्याला समप्रमाणात पाण्याचा वाटप करण्यात येते. मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनीसह परिसरातील ४० ते ५० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व शेतीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी नदी काठावरील गावातही पिण्याचे पाणी व शेतीकरिता धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.आ. चरण वाघमारे, मध्यप्रदेशातील आ. के.डी. देशमुख, खा. बोधसिंग भगत यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, तथा राज्य सरकारला पाण्याचा विसर्ग करण्याकरिता साकडे घातले होते. बावनथडी नदी सध्या कोरडी पडली आहे. पाच टीएमसी पाणी रविवारी सोडण्यात आले, परंतु कोरडी नदी असल्याने पाणी नदीत जिरले. मोवाडपर्यंत पाणी जाण्याकरिता पुन्हा पाच टीएमसी पाणी सोमवारी सोडणार असल्याची माहिती मध्यप्रदेशातील धरणाचे तांत्रिक कर्मचारी ठाकरे यांनी लोकमतला दिली. बावनथडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम, उपविभागीय अधिकारी पाखमोडे यांचेशी संपर्क केल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही.