शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

३९ लाख रुपयांचा पाणी पट्टीकर थकीत

By admin | Updated: March 12, 2016 00:35 IST

दीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारादीड लक्ष नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भंडारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी पाणी पट्टीकर लक्षावधी रूपयांनी अडवून ठेवला आहे. जवळपास ३९ लक्ष रूपये थकीत असल्याने बरीचशी कामेही अडकली आहेत. शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याची बोंब असताना दुसरीकडे नागरिक व शासकीय कार्यालयांनी लक्षावधींची पाण्याची बिले लटकवून ठेवली आहे.तृष्णातृप्ती करणारे पाणी वैनगंगेच्या पदरात असतानाही भंडारेकरांना शुद्ध पाण्यासाठी तरसावे लागत असल्याचा प्रकाराला भंडारेकर वैतागले. कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मुबलकता यावी, या दृष्टीकोनातून साकारण्यात येणारे प्रयत्न व निर्णय फसले आहेत. भविष्यकालीन योजना अंमलात आणण्याची तयारी सुरू झालेली नाही.हा उन्हाळाही नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठ्यात काढावा लागणार आहे. दुसरीकडे दीड दशकापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून भंडारा शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगर पलिकेच्या खांद्यावर देण्यात आली. आजघडीला शहरात जवळपास १० हजार ५०० च्यावर नळ ग्राहकांची संख्या आहे. ज्या शासकीय कार्यालयांमध्ये पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरवठा केला जातो, त्या कार्यालयांची बिले नियमित असल्याचे दिसून येते.नागरिकांनी वेळेवर पाणी पट्टीकर दिल्यास त्याचा नगर पलिकेला फायदाच होईल. पाण्याची समस्या पाहता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच शहरात कुठेही जलवाहिनी लिकेज असल्यास त्याची माहिती पाणी पुरवठा विभागाला द्यावी, याची तत्काळ दखल घेण्यात येईल.- रवींद्र देवतळे, मुख्याधिकारी, नगर परिषद, भंडारा.१ कोटी ८३ लाख रूपयांचे उद्दिष्टभंडारा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सन २०१५-१६ मध्ये १ कोटी ८३ लक्ष रूपयांची पाणीपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी वित्तीय वर्षात चालु महिन्यात ३९ लाखांची ‘आऊटस्टॅडिंग’ उर्वरित आहे. म्हणजेच नळग्राहकांकडून पाणीपुरठयाचे ३९ लक्ष रूपये घेणे शिल्लक (घेणे) आहे. जीर्ण जलवाहिनी व पालिकेच्या नियोजनशुन्य प्रशासनामुळे शहरातील समांतर पाणी वाटप होत नाही, असे नागरिकांचे म्हणने. अव्वा सव्वा बिल दिले जाते. पाणी येण्यापूर्वी जलवाहिनीतील हव्याच्या दाबामुळे मीटर जलद गतीने फिरते ; मात्र मुबलक व शुद्ध प्रमाणात पाणी मिळत नाही. बील भरण्यासाठी म्हटल्या जाते. हवचा पैसा द्यायचा काय? पंरतु पाणीपुरवठ्याच्या सुविधांमध्ये बदल केला जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणने आहे.