शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

८०० हेक्टर शेतीला मिळणार पाणी

By admin | Updated: November 17, 2016 00:40 IST

चांदपूर जलाशय अंतर्गत पाणी वाटपाचे पाणी पट्टी कराचे १७५ लाख रूपयांची थकबाकी शेतकऱ्याकडे असताना उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नाही, ...

नव्याने तीन गावांचा समावेश : करारनामे शेतकरी करणार, थकबाकीनंतरही दिलासाचुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशय अंतर्गत पाणी वाटपाचे पाणी पट्टी कराचे १७५ लाख रूपयांची थकबाकी शेतकऱ्याकडे असताना उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नाही, अशी परिसरात चर्चा सुरू असताना यंदा डावा कालवा अंतर्गत ८०० हेक्टर आर शेतीला उन्हाळी धान पिकाला पाणी वाटप करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने बैठकीत घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सिहोरा परिसरात मध्यम प्रकल्प चांदूपर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या देखरेख खाली दोन पाणी वापर संस्था कार्यरत आहे. या पाणी वापर संस्थेकडे पाणी पट्टी कराची जुनी थकबाकी आहे. लघु पाटबंधारे विभागाचे शेतकऱ्यांकडे पाणीपट्टी कराचे १७५ लाख रूपयांची थकबाकी शिल्लक आहे. ही थकबाकी वसुलीकरिता जुन्या नोटा स्विकारण्यासाठी उपक्रम सुरू केला असताना शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. साधे थकबाकीचे १७५ रूपये पाटबंधारे विभागाच्या तिजोरीत जमा झाले नाही. थकबाकीचा फुगणारा आकडा चिंतेचा असणारा आहे. याशिवाय चांदपूर जलाशयाला तारणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाकडे ६० लाख रूपये विजेची थकबाकी असल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामुळे पाणीपट्टी करांच्या वसुली करिता पाटबंधारे विभागाची यंत्रणा शेतकऱ्यात जनजागृती करित आहे. या विभागात मजुराच्या खांद्यावर प्रशासकीय कारभाराचा डोलारा सुरू आहे. निम्याहून अधिक महत्वपूर्ण पदे रिक्त आहेत. लिपिक, शाखा अभियंता या पदाचा ठणठणाट आहे. १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्याची जबाबदारी प्रभारी शाखा अभियंताच्या मानगुटीवर देण्यात आली आहे. त्यामुळे विकास कामे प्रभावित झाली आहे. जबाबदार नियमित कर्मचारी कार्यरत नसल्याने मजुर गटात येणारे कार्यरत कर्मचारी कानावर हात ठेवत आहेत. या विभागात मनुष्य बळाचा अभाव असल्याने मजुर पाणी वाटपाची जबाबदारी स्विकारत नाहीत. उन्हाळी धान पिकांना अधिक पाण्याची गरज लागत असल्याने यंदा चांदपूर जलाशयात असणारे शिल्लक २२ फुट पाणी शेतकऱ्यांना मिळणार किंवा नाही अशी चर्चा सुरू झाल्या असताना पाठबंधारे विभागाने रोटेशन पद्धतीने पाणी वाटपाचा निर्णय घेतला आहे. रोटेशन पद्धतीनुसार यंदा डावा कालवा असल्याने ३५० हेक्टर आर शेतीची निवड बैठकीत करण्यात आली. ही चुल्हाड गावच्या हद्दीतील आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायतमध्ये अल्प प्रतिसादपाठबंधारे विभागात रिक्त पदे असल्याने थकबाकी वसुली करिता ग्राम पंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वत:हून शेतकरी थकबाकीची राशी कार्यालयात येवून जमा करित नाहीत. यामुळे पर्याय शोधण्यात आला असता शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला आहे. यामुळे थकबाकीचा वाढता आकडा आहे. थकबाकी देयकासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे.रिक्त पदाचा अनुशेष भरापाटबंधारे विभागात रिक्त पदाचा अनुशेष टेंशन वाढविणारा आहे. ही पदे तात्काळ भरली पाहिजे. यामुळे पाणीपट्टी कराची वसुली प्रभावित होणार नाही, अशी माहिती आहे.पाठबंधारे विभागातील रिक्त पदे, कालवा व नहराचे सिमेंट अस्तरिकरण झाले पाहिजे. शेतकऱ्यांचे हितासाठी या विभागाला सक्षम केले पाहिजे. -राजेंद्र ढबाले, सदस्य पं.स. चुल्हाड.