शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडूंब

By admin | Updated: July 31, 2016 00:23 IST

शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.

विहिरींची पातळी वाढली : मोहाडी तालुक्यातील शेतीला संजीवनी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर फुलले हास्यभंडारा : शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोहाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात १५ गावांचा समावेश करण्यात आला. या गावात सर्व यंत्रणांनी मिळून शेततळे, सिमेंटनाला बांध, नाला खोलीकरण, मजगी, साठवण तलाव दुरुस्ती, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, बोडी नूतनीकरण व भातखाचरे पुनर्जीवन अशी २४३ कामे पूर्ण झाली आहेत.जलयुक्त शिवार अभियानात पूर्ण झालेल्या कामात पाणी साठले असून याचा वापर शेतकरी धान पिकासाठी करत आहे. मोहाडी तालुक्यात या मोसमात जलयुक्त शिवारच्या कामात १७०० टिसीएम पाणीसाठा झाला असून याद्वारे १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणे अपेक्षित आहे. २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव, बोरी, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा, नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी व खैरलांजी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. मोहाडी तालुक्यात नालाबांध व शेततळे तुडूंब भरले असून विहिरीच्या पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात शेततळे ३१, सिमेंट नालाबांध १९, नाला खोलीकरण ५५, सिमेंट नालाबांध दुरुस्ती १७, मजगी १८ (३५ हेक्टर), साठवण तलाव १३, बोडी नूतनीकरण ७, भातखाचरे पुनर्जीवन ८२ (१२४ हेक्टर) अशी एकूण २४३ कामे पूर्ण झाली आहेत. झालेल्या कामात १७०० टीसीएम पाणी साठले असून या पाण्यावर १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणार आहे. जलयुक्त शिवारामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले असून त्याचा वापर सिंचनासाठी होत आहे. धान रोवणीसाठी या पाण्याचा वापर केला आहे. पावसाने सरासरी गाठली नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीला जलयुक्त शिवारच्या कामातील साठलेले पाणी धावून येत आाहे. (शहर प्रतिनिधी)मोहाडी तालुक्यात १०८ गावे असून त्यापैकी १५ गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. अडलेल्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठी वापर करीत आहेत. बांध व शेततळ्यात साठलेले पाणी धानासाठी संजीवन ठरत आहे. सोबतच विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात १० गावांची निवड झाली असून या ठिकाणी कामे सुरु आहेत.- आर.जे. पात्रीकरतालुका कृषी अधिकारी, मोहाडी