शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी विकत घेऊन नळ धारकांना केला जातो पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:05 IST

करडी या गावाला वाढत्या लोकसंख्येनुसार दररोज ३ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेची क्षमता २ लाख लिटर इतकीच आहे.

ठळक मुद्देसंकट पाण्याचे : करडी येथे पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी

युवराज गोमासे ।आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : करडी या गावाला वाढत्या लोकसंख्येनुसार दररोज ३ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेची क्षमता २ लाख लिटर इतकीच आहे. त्यातच विहीर कोरडी पडल्यामुळे अनेक दिवस पाणी पुरवठा बंद होता. त्यावर उपाय म्हणून करडी ग्रामपंचायतीला राजेश राऊत या शेतकऱ्याकडून दररोज ३२० रूपये दराने पाणी विकत घेऊन जानेवारी २०१८ पासून दीड लाख लिटर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती पाहता आणि पाणीपट्टी कर थकीत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत आले आहे.मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळामुळे होरपळून निघाला आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहेत. करडी पाणी पुरवठा योजनेची विहिर कोरडी पडली आहे. करडी गावाला पाणी पुरविण्यासाठी दोन लाख लिटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. पूर व अन्य अडचणींमुळे यापूर्वी पाणी पुरवठा वारंवार खंडीत असायचा. त्यावर उपाय म्हणून माजी जि.प. सदस्य श्रीराम येळणे व माजी जि.प. सदस्य रामकृष्ण शेंडे यांनी या योजनेच्या विहिरीसाठी मुंढरी खुर्द येथील शालीकराम राऊत यांचेशी चर्चा करून शेतजमीन ग्रामपंचायतीला दान दिली. त्यानंतर माजी जि.प. सदस्य महेंद्र शेंडे यांच्या प्रयत्नातून १८ लाख रूपयांची पाईपलाईन योजना कार्यान्वित करण्यात आली. करडीची लोकसंख्या पाच हजारावर गेल्याने पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच योजनेवर होणारा खर्चही वाढला आहे. मागील तीन वर्षांपासून पावसाअभावी रोवणीविणा हजारो एकर शेती पडीत राहत असते. यावर्षीही अत्यल्प पावसामुळे नदीनाले, तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट होता.निसर्गाच्या अवकृपेमुळे करडी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यावर उपाय म्हणून जि.प. सदस्या निलीमा इलमे व सरपंच महेंद्र शेंडे व ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी राजेश राऊत यांना पाणी देण्याची विनंती केली. गावाची अडचण लक्षात घेऊन त्यांनी स्वत:च्या शेतीतील विहिरीतून जानेवारीपासून गावाला पाणी पुरवठा करीत आहेत.गावाला दररोज ३ लाख लिटर पाण्याची गरज आहे. योजनेची क्षमता दोन लाख लिटरची आहे. त्यातच विहिरी कोरडी पडल्याने त्यावर उपाय म्हणून दररोज ३२० रुपये दराने दीड लाख लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. परिणामी ग्रामपंचायत अडचणीत आली आहे. त्यामुळे गावात राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर होण्याची गरज आहे.- महेंद्र शेंडे, सरपंच करडीराष्ट्रीय पेयजल योजनेसाठी ग्रामपंचायतीचे ठराव प्राप्त झाले. जि.प.मध्ये हा विषय मांडण्यात आला. वारंवार पाठपुरावा केला जात आहे. गावाला राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्नरत आहे.- निलीमा इलमे, जि.प. सदस्या करडीग्रामपंचायत सरपंच व जि.प.सदस्यांनी गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. त्यामुळे पाण्याची सुविधा करून दिली परंतु माझी शेती अडचणीत येण्यापूर्वी प्रशासनाने यावर उपाययोजना करावी.- राजेश राऊत, पाणी पुरवठादार शेतकरी मुंढरी.