शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

विद्युत पुरवठ्याअभावी रखडली पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: April 10, 2015 00:45 IST

तालुक्यातील मोरगाव व राजेगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजना विद्युत जोडणी अभावी रखडली आहे.

लाखनी : तालुक्यातील मोरगाव व राजेगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजना विद्युत जोडणी अभावी रखडली आहे. विद्युत पुरवठा झाल्याशिवाय पाण्याचा पुरवठा करता येणार नसल्याचे मोरगावचे सरपंच नाजूक भैसारे यांनी स्पष्ट केले आहे.मागील दहा वर्षापासून ५० हजार लिटर क्षमतेच्या टाक्या तयार आहेत. पाणीपुरवठा समितीच्या माध्यमातून पाण्याची टाकी व नळयोजना तयार करण्यात आली. यासाठी लक्षावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. परंतु अद्यापपर्यंत मोरगाव व राजेगाव येथील लोकांना टिपूसभरही पाणी मिळाले नाही.मोरगाव येथे निलागोंदी येथील तलावावरून पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली तर राजेगावला बोरगाव नाल्यावरून पंपहाऊसची व्यवस्था करण्यात आली आहे. नळयोजनेच्या दुरुस्ती व इतर साहित्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजनाद्वारे पुन्हा निधी उपलब्ध करून दिला आहे. पाणी भरण्यासाठी विद्युत जोडणीची गरज आहे. लाखनी परिसरात कृषीपंपाकरिता वेगळे फिडर तयार करण्यात आले आहेत. विद्युत विभागाने ग्रामपंचायतला इलेक्ट्रीक वायर लांबविण्यासाठी व खांबासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. यात ग्रामपंचायतला दोन ते तीन लक्ष रुपयांचा खर्च आहे. ग्रामपंचायतच्या स्थानिक फंडात इतका पैसा नसतो. यामुळे ग्रामपंचायत विद्युत वितरण विभागाची मागणी पूर्ण करू शकत नाही. सरपंच नाजूक भैसारे व सरपंच बाळा ठाकरे यांनी नळयोजनेसाठी विद्युत पुरवठा कृषी फिडरवरून करावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. कृषी पंपांना आठ तास विद्युत पुरवठा केला जातो. आठ तासात पाण्याची टाकी भरणे शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राजेगाव व मोरगावसाठी १४ लक्ष रुपयाचा निधी नळ दुरुस्ती व साधनसामुग्री खरेदी साठी मंजूर केले आसहे. विद्युत पुरवठ्याचा प्रश्न सुटल्यानंतर राजेगाव व मोरगाव येथील तीन हजार लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. (तालुका प्रतिनिधी)