शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पिंपळगावात दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: October 5, 2015 01:04 IST

तालुक्यातील पिंपळगाव (सडक) हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वपूर्ण ठिकाण आहे. समृध्द आत्म सांस्कृतिक परंपरा ...

३० लाखांचा प्रस्ताव : स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरजचंदन मोटघरे लाखनीतालुक्यातील पिंपळगाव (सडक) हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वपूर्ण ठिकाण आहे. समृध्द आत्म सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या पिंपळगावात अनेक ठिकाणे पावसाळ््यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जानवत आहे. राष्ट्रीय महामार्गावर ३ कि.मी. पर्यंत पिंपळगाव विखुरलेले आहे. पिंपळगावातील इंदिरा नगर, भिमटोली या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ग्रामपंचायतच्या पुढाकाराने पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी तो अपुरा आहे.पिंपळगावची चार हजार पाचशे लोकसंख्या आहे व गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने विखुरलेले आहे. पिंपळगाव-सामेवाडा रस्ता, पिंपळगाव-मुरमाडी (तुपकर) रस्ता व तीन कि.मी. पर्यंत राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वसाहत आहे. येथील पाणीपुरवठा योजना लाखनीतील ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कार्यान्वित केली जात आहे. १९८० ला तयार झालेली व १९८४ ला कार्योन्वित केलेली योजना आजतागायत कायम आहे. अशोका बिल्डकॉनद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असतांनी पाणीपुरवठा योजना ठप्प पडलेली होती. दोन वर्षापूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची ११० जोडणी होती. पाणी पोहचत नसल्यामुळे व आकारणी न दिल्यामुळे काही जोडणी बंद करण्यात आले. सद्या केवळ ५८ जोडणी आहेत. सन २०१३-२०१४ मध्ये ग्राहकाकडून २ लाख ८१ हजार ३०० रुपयेची पाणीपट्टी आकारणी होते ती कमी करण्यात आली. वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण होत ताही सन् २०१४-२०१५ मध्ये १ लाख ९९ हजार ८६० रुपयाचे वसुलीचे उद्दिष्ट होते. अद्यापपर्यंत ५० हजार रुपयापर्यंत वसुली करण्यात आलेली आहे.पिंपळगाव (सडक) येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे. १९८४ मध्ये तयार करण्यात आलेली ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी निष्कृष्ट अवस्थेत आहे. त्या टाकीत पाणी जमा होत नाही. जोडणीधारकांना जांभळी बंधारा येथील पंपहाऊ स वरुन सरळ पाणी पुरविले जाते. पाण्याचे शुध्दीकरण न करता पाणी पुरविले जात असल्याने जनतेच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ््यात गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला ग्रामपंचायतने पंपहाऊ स वरुन सरळ जोडणीधारकांना पाणीपुरवठा करण्याबाबचे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. पिंपळगाव येथील पाण्याची टाकी केव्हाही पडू शकते. इतकी जर्जर झाली आहे. पाण्याची टाकी पाडणे आवश्यक आहे. अन्यथा धोका निर्माण होवू शकतो. शासनाची जीवन प्राधीकरणची योजना तयार आहे. परंतु सदर जिल्हा परिषदेने स्विकारली नाही. पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्याना सदर योजना स्विकारली नाही. ग्रामपंचायतने पाण्याची टाकी व योजनेचा भार उचलावा अशी अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेने जीवन प्राधीकरणच्या नळयोजनेचा भार पेलवू शकणार नसल्याची चर्चा आहे.