शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी धरणातून मध्य प्रदेश राज्यात पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:59 IST

बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही जलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील मुख्य कालवा व वितरीकेतपाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देपाच दलघमी पाणी सोडले : मुख्य कालवा व वितरिकेतून विसर्ग

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही जलसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील मुख्य कालवा व वितरीकेतपाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.२९ एप्रिल रोजी बावनथडी नदीत ८ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात जलसंकट व शेती पिकांकरिता बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.त्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी १ वाजता ३ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. संध्याकाळी पुन्हा २ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.तुमसर व मोहाडी तालुक्यात सध्या जलसंकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील मुख्य कालवा व वितरिकेत बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. सदर प्रमुख मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. बावनथडी धरण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचे संयुक्त धरण असून धरणाचा पाणीसाठ्यावर मध्यप्रदेश शासनाची देखरेख व नियंत्रण आहे.सध्या जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु असल्याने प्रमुख समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे व जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी आरोप केला आहे.