शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बोरी वितरिका फुटली शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:00 IST

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाºया बावनथडी प्रकल्पाची बोरी भूमिगत वितरिका फुटल्यामुळे वितरिकेचे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे रोवणी झालेल्या उभ्या धानपिकाची नासाडी झाल्यामुळे बोरी वितरिका शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे.

ठळक मुद्देधान पिकाची प्रचंड नासाडी

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाºया बावनथडी प्रकल्पाची बोरी भूमिगत वितरिका फुटल्यामुळे वितरिकेचे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे रोवणी झालेल्या उभ्या धानपिकाची नासाडी झाल्यामुळे बोरी वितरिका शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या जलसंपदा विभागाने बावनथडी प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून बोरी वितरिका साजा क्रमांक ३२०० मीटर ही भुभाग न खोदता जमिनीच्या आतून (भूमिगत) वितरिका तयार करण्याचे कंत्राट इंडियन होम पाईप कंपनी मुंबईला दिले. बोरी वितरिका तुमसर मांगली, तामसवाडी, तुडका, नवरगाव, उमरवाडा, बोरी, शिवणी, कोष्टी, बाम्हणी हे गाव ओलिताखाली येणार आहेत.वितरिका तुमसर शहरातून नेताना तांत्रिक अडचणी असल्यामुळे देव्हाडी रोड मार्गावरील रायबहादूर हिंदी शाळेजवळ पुलाखालून पाईप लाईन टाकण्यात आली. ते टाकत असताना शेतकºयांचे नुकसान होणार नाही, अशी अट विभागाने घातली होती. त्याठिकाणी शेतकºयांनी मजबुत पाळ बांधून नाली खोदकाम करण्याची विनंती केले. पंरतु कपंनीच्या लोकांनी ती विनंती धुडकावून लावली होती. त्याचे पर्यावसन ही भूमिगत वितरिका कपंनीच्या गलथान कारभारामुळे फुटली.परिणामी श्रमपाल कारेमोरे यांच्या १० एकर शेतात पाणी शिरले व रोवणी झालेल्या उभ्या धान पिकाची नासाडी झाली. विभागाच्या अधिकाºयांनी दखल घेऊन या शेतकºयाला दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी आणि वितरिका दोषमुक्त कार्य करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.वितरिकेचे पाणी शिरल्याचे कळताच आमची चमू घटनास्थळी पोहचली. शेतात शिरलेले पाणी बाहेर कढून घटनेचा पंचनामा करून आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविणार आहे.- पी. व्ही. वाघमोडे, उपविभागीय अभियंता बावनथडी प्रकल्प.१५० रूपये मजुरी देऊन रोवणीचे काम करवून घेतले होते. शेतात पाणी शिरल्याने आता सर्व काही गेल्याची स्थिती निर्मा झाली आहे.- श्रमपाल कारेमोरे, शेतकरी.