शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी कोरड्या होऊ लागल्याने पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:02 IST

आॅनलाईन लोकमतकेशोरी : गावालगत असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी धानपीक लागवडीची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील विहिरी झपाट्याने कोरड्या पडू लागल्या आहेत. या प्रकारामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभाग व ग्रामपंचायतने गावालगतच्या शेतकºयांनी धान पिकाची लागवड करू नये, असा आदेश शेतकºयांना ...

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : प्रशासनाचे आदेश धुळकावले

आॅनलाईन लोकमतकेशोरी : गावालगत असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी धानपीक लागवडीची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील विहिरी झपाट्याने कोरड्या पडू लागल्या आहेत. या प्रकारामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभाग व ग्रामपंचायतने गावालगतच्या शेतकºयांनी धान पिकाची लागवड करू नये, असा आदेश शेतकºयांना देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाचे पºहे टाकले आहेत. गावालगत शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोअरद्वारे २४ तास मोटार चालू ठेवल्याने गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळा सुरू होण्यास अजून दोन महिने शिल्लक असताना विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.मार्च, एप्रिल, मे व जून या चार महिन्यांपर्यंत गावातील विहिरींचे पाणी नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उन्हाळा चालू होण्यापूर्वीच विहिरीतील पाणी पातळी ७० टक्केपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरींची काय अवस्था होईल, याची नागरिकांना चिंता वाटू लागली आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली तर सर्व ग्रामस्थांना मोठा त्रास होईल व पाण्यासाठी उन्हातान्हात त्यांना भटकंती करावी लागेल. याची दक्षता आताच घेतलेली बरी, असे नागरिकांचे मत आहे. त्यासाठी उन्हाळी पीक न घेण्याचे आदेश देण्याची गरज आहे. याप्रकरणी कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीने विशेष लक्ष देऊन उन्हाळी पीक घेवू नये, असे आदेश शेतकºयांना देण्यात यावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.