शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा येथे पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: April 10, 2017 00:37 IST

तुमसर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे.

प्रशासन सुस्त : उपाययोजना शून्य, महिला काढणार घागरमोर्चा, गावातील विहिरी पडल्या कोरड्यारमेश लेदे  जांब (लोहारा) तुमसर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. परिणामी महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने लोहारा येथील संपूर्ण विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. भर उन्हामध्ये शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. नळ योजनेकरिता गावामध्ये दोन बोअरवेल आहेत. त्यापैकी एक बोअरवेल मार्च महिन्यापूर्वीच पाण्याअभावी बंद पडली तर दुसरी बोअरवेल येत्या दोन ते चार दिवसात बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लोहारा येथे सन २०११ ते २०१२ पासून सतत पाणीटंचाई भासत आहे. पाणी टंचाईवर पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाकडून उपाययोजना केली गेली नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. मे आणि जून महिना शिल्लक आहे. लोहारा गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या वर असून गावामध्ये तीन सार्वजनिक विहिरी आहेत. पण त्या सन २०११ पासून कोरड्या पडल्या आहेत. बोअरवेलची संख्या आठ आहे. मात्र दोन वगळता पूर्ण पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या बंद पडल्या आहेत. नळ योजनेकरिता दोन बोअर मारण्यात आल्या होत्या. एक पूर्वीच बंद पडली तर दुसरी झटके देत आहे.गावकऱ्यांना पिण्याचा पाणी सुद्धा पुरेसा मिळत नाही. लोहारा येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या जलकुंभामध्ये पाणी पुरवठा करणारी दोन्ही बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गावात पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तरीपण गावालगत गाव फिडरवर असलेल्या बोअरवेल कृषी फिडरवर करण्यात यावे. जेणेकरून शेतीसाठी होणारा निरंतर पाणी उपसा थांबल्यास काही प्रमाणात पाणी टंचाईवर मात करता येवू शकते. या संदर्भात मागील वर्षापासून गाव फिडर व कृषी फिडर वेगवेगळे करण्यासाठी खांब उभे केले. पण "तार" अजूनपर्यंत लावण्यात आले नसून त्यांचे काम मागील वर्षापासून कासवगतीने असल्याची तक्रार सरपंच शामराव ठाकरे व उपसरपंच गुलाब पिलारे यांनी केली आहे. गावामध्ये ग्रामपंचायतकडून सकाळपाळीमध्ये ७ ते ८ वाजता दरम्यान नळ सुरु करतेवेळी गावातील १ तासाकरिता विद्युत पुरवठा ताबडतोब खंडीत करण्यात यावा. जेणेकरून टिल्लू पंपाद्वारे अवैध पाणी उपसा करणाऱ्या नळ खातेदारांना पाणी उपसा करता येणार नाही. पाणी टंचाईवर मात करता येईल, असे ग्रामपंचायतमध्ये ठराव सर्वानुमते मंजूर करून शाखा अभियंता, विद्युत विभाग, आमदार चरण वाघमारे, तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावर लोकप्रतिनिधी व अधिकारी काय उपाययोजना करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून लोहारा येथील पाणी समस्या मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायत तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे.