शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

दहा प्रकल्पांच्या पाण्याचा भार एकट्या गोसेखुर्दवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST

भंडारा : गोसे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला की बुडीत आणि लाभक्षेत्रातील वैनगंगा नदीतीरांवरील गावांना महापुराचा धोका असतो. नियंत्रित ...

भंडारा : गोसे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला की बुडीत आणि लाभक्षेत्रातील वैनगंगा नदीतीरांवरील गावांना महापुराचा धोका असतो. नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग झाला नाही तर महापुरात कोट्यवधी रुपयांची हानी होते. दहा प्रकल्प आणि चार नद्यांचे पाणी एकट्या गोसेखुर्द प्रकल्पात येत असल्याने नियोजन करताना मोठी तारांबळ उडते. त्यातच समन्वयाचा अभाव असला की गतवर्षीसारखी भीषण स्थिती निर्माण होते.

पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. पर्यायाने त्याचा संजय गोसेखुर्द प्रकल्पात होतो. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. वर्षभर यापासून कोणताही धोका नसला तरी पावसाळ्यात मात्र अतिवृष्टी झाली की या प्रकल्पांचे पाणी सोडले जाते आणि संपूर्ण भार एकट्या गोसेखुर्द प्रकल्पावर येऊन पडतो. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना मोठी कसरत करावी लागते. एकाच वेळी पाण्याचा विसर्ग केला तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते.

गतवर्षी महापुराला हेच कारण महत्त्वाचे ठरले. संजय सरोवरासह सर्व दहा प्रकल्पांतील पाणी एकट्या गोसेखुर्द प्रकल्पात जमा झाले. त्यामुळे बॅकवाॅटरमध्ये असलेल्या भंडारा शहरासह अनेक गावांना पुराचा फटका बसला. गोसेखुर्दचे ३३ दरवाजे सतत सात दिवस गतवर्षी उघडावे लागल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यँत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा प्रशासनाने समन्वयाच्या माध्यमातून पाणी नियंत्रणावर भर दिला आहे. सर्व प्रकल्पाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एकमेकांच्या संपर्कात आहेत.

बॉक्स

संजय सरोवरचे पाणी आज पोहोचणार कारधात

मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्प गुरुवारी ९४ टक्के भरल्याने त्याचे तीन गेट उघडण्यात आले होते. दोन गेट अर्धा मीटरने, तर एक गेट एक मीटरने उघडण्यात आले. २९४.५० क्युसेक पाण्याचा विसर्ग गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आला. सतत नऊ तास पाण्याचा विसर्ग झाला. या प्रकल्पातून सोडलेले पाणी भंडारालगतच्या कारधा येथे वैनगंगा नदीत येण्यासाठी ३९ तास लागतात. त्यामुळे साधारणत: शनिवारी या प्रकल्पाचे पाणी पोहोचणार आहे. त्यामुळे गोसेखुर्दच्या जलसाठ्यात वाढ होणार असून पाणीविसर्गासाठी नियोजन करण्यात आले आहे.

बॉक्स

पुजारीटोलाचे १२ गेट उघडले

गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला प्रकल्पाचे १२ गेट ०.३० मीटरने उघडण्यात आले असून २८६.४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हे सर्व पाणी वैनगंगेच्या माध्यमातून गोसेखुर्द प्रकल्पातच येणार आहे. पुजारीटोलापासून पाणी येण्यासाठी ३२ तासांचा अवधी लागणार आहे. यामुळे नदीतीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.