शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या विहिरीतून पाण्याचा उपसा

By admin | Updated: May 14, 2017 00:19 IST

शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे.

लोकमत शुभवर्तमान : मऱ्हेगावचे सरपंच बेंदवार यांच्या प्रयत्नाला यशमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शीर्षक वाचून आश्चर्यात पडलात ना! मात्र हे खरे असून सत्यात घडलेली बाब आहे. लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील कोरड्या विहिरीतून जलसंचय करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला असून ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची चिंता यातून मिटली आहे. दुर्लक्षित ठरलेल्या विहिरीतून पाण्याचा नवा जलस्त्रोत शोधणे हा नवलाईचा विषय ठरला आहे.‘रगडता वाळूचे कण, तेलही गळे’ या म्हणीला तंतोतंत जुळणारे कर्तृत्व मऱ्हेगाव येथे सत्यात उतरविण्यात आले. मऱ्हेगाव या जेमतेम १५०० लोकवस्तीचे हे गाव नवीन व जुनी अशा दोन वस्त्यांमध्ये विभागली आहे. या गावातील दोनही विहिरी मार्च, एप्रिल दरम्यानच कोरड्या ठाक पडल्याने ग्रामस्थांना पाण्याची चणचण भासत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. दोन्ही वस्त्यांमिळून एकमेव हातपंप असून तोही सध्या कामात नाही. त्यामुळे पाण्यांसाठी येथील आया-बहिणींची होणारी कुचंबना व वेळप्रसंगी महिलांमध्ये होणारे भांडण, तंटे. ही बाब लक्षात घेवून येथील सरपंच श्यामा बेंदवार यांनी गावातील एका सार्वजनिक विहिरीत जलस्त्रोत आटल्याने आता केवळ वाळूच दिसते. मऱ्हेगाव हे गाव चुलबंद नदीच्या काठावर असल्याने या नदीलगतच्या गावांमधील विहिरींमध्ये वाळूचे थर दिसून येते. अशा वाळवंट प्रदेश सारख्या दिसणाऱ्या या गावातील सरपंच बेंदवार यांनी गावातील पाणीटंचाईची झळ बघविली गेली नाही. त्यामुळे त्यांनी गावातील युवांना हाताशी धरून विहिरीतील वाळूत लोखंडी पाईप टाकला. त्यावर मोटारपंप बसवून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला. तीन तासाच्या प्रयत्नानंतर जलस्त्रोत सापडला. आज सकाळी या विहिरीवर पाणी भरणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता.असा केला प्रयत्न४० फूट खोल विहिरीतील जलस्त्रोत आटला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच विहिरी कोरड्या झाल्या असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली. ही गंभीर समस्या दिसून आल्याने बेंदवार यांनी विहिरीत १५ फूट लोखंडी पाईप वाळूत खोलवर खुपसला. त्यावर फिल्टर पंप लावून पाणी ओढले व क्षणात सर्वांचे चेहरे आनंदी झाले. ही किमया मोटरपंप सुरू केल्याने हवेच्या दाबामुळे जमिनीत खोलवर असलेले पाणी बाहेर फेकू लागले. गावकऱ्यांसाठी ही किमया एका आश्चर्यापलीकडची ठरली आहे.चुलबंद नदीकाठावरील गावांमध्ये रेतीच्या अमाप उपशामुळे भुजल स्त्रोत कमी होत आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांपुढे पाण्याची समस्या आहे. ग्रामस्थांनी केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नातून पाण्याचा नवा स्त्रोत शोधण्यात यश आले- श्यामा बेंदवार, सरपंच मऱ्हेगाव.