भंडारा : शहरातील महात्मा ज्योतिबा फुले वॉर्डात रस्त्याच्या दोन फूट उंच असलेल्या सार्वजनिक नळाला काही संधीसाधूंनी खड्डा खोदून खाली केले. त्यामुळे हा नळ पाणी ओढत असल्याने आजूबाजूच्या ८ ते १० खाजगी नळ कनेक्शनधारकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात या वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी बोंबा ठोकाव्या लागत आहेत.मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाची प्रखर किरणे जमिनीवर आपटत आहेत. तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. या तापमानाचा शहरातीलच नव्हे तर, ग्रामीण भागातील जनतेनेही धसका घेतला आहे. याच पहिल्या आठवड्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाणी पेटले आहे. नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे दरवर्षी शहरात पाणीप्रश्न उग्ररूप धारण करत आहे. शहरातील अनेक भागात आजही दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यामुळे होणारे संभावित जलजन्य आजार लक्षात घेता, नगरपालिकेने ठोस उपाययोजना करावयास पाहिजे होती. परंतु, भान हरपलेली नगरपालिका उपाययोजना करून शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. पाण्यासाठी घराघरात, शेजाऱ्यांमध्ये भांडणे जुंपायला सुरुवात झाली आहे. भंडारा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले वॉर्डात (प्रभाग क्र.३) तुलाराम मानापुरे यांच्या घराजवळ फार वषार्पूवीर्पासून सार्वजनिक नळ आहे. या नळावरून २० ते २५ कुटुंब पाणी भरून आपली तहान भागवत होते. नळ हा मुख्य पाईपलाईनच्या अगदी जवळ आणि रस्त्याच्या दोन फूट उंचीवर होता. त्यामुळे या नळाच्या आसपास असलेल्या खाजगी नळ कनेक्शनधारक कुटुंबांना आवश्यक इतका पाणीपुरवठा होत होता. परंतु, काही संधीसाधू लोकांनी सार्वजनिक नळाला खड्डा खोदून खाली केले. सद्य:स्थितीत या नळाला पाण्याचा 'फोर्स' जास्त असून, सकाळी १० वाजतापर्यत हा नळ सतत वाहत असतो. काही मोजकेच कुटुंब या नळावरून पाणी भरत असतात. तथापि, या नळाच्या आजूबाजुला ८ ते १० खासगी नळ कनेक्शनधारक आहेत. सार्वजनिक नळाला खाली केल्यामुळे खासगी नळ कनेक्शनधारकांना आवश्यक इतके पाणी मिळत नाही. सार्वजनिक नळावर पाण्यासाठी दररोज भांडणे होत असून, अश्लिल शब्दाच्या माऱ्याने परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. उल्लेखनिय म्हणजे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आली. परंतु, विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पाणी पाऊचची विक्री वाढलीशहरात अचानक प्याऊंची संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे चौकाचौकात पानठेला चालक, चहा विक्रेते थर्माकोलच्या डब्यात पाणी पाऊच विक्रीसाठी ठेवत असल्याचे चित्र दिसले. तीन रुपये देऊन एक पाऊच विकण्यात येते. त्यामुळे एखाद्या गरिबाला तहान लागल्यास आणि त्याच्या खिशात पैसे नसल्यास त्याचा नाईलाज होत आहे.पाण्याचा धर्म विसरलो का आपण?भंडारा : पाणी हे जीवन आहे, म्हणूनच असेल कदाचित आपल्या पूर्वजांनी पाण्याला थेट धर्माची उपमा दिली. साध्या पाण्यानेही मोठे धर्मकारण साधले जाऊ शकते, हाच संदेश यातून द्यायचा होता. तो संदेश समाजापर्यंत नीट पोहोचला अन् एखाद्याची तृष्णा भागवण्याला पुण्याचे काम समजले जाऊ लागले.म्हणूनच कधी काळी उन्हाळा आला की येथील काही संघटना, संस्था चौकचौकात पाणपोई उभारायचे. परंतु पुढे काळ बदलला आणि पाणी हे पुण्याचे नसून व्यवसायचे माध्यम झाले. आता शहरात अपवादानेच पाणपोया दिसतात. परिणामी साधे पाणीही विकत घेऊन प्यावे लागते. ज्यांच्यात ते विकत घेण्याची क्षमता नसते ते कोरड्या गळ्यानेच रखरखत्या उन्हात पोटासाठी धावत असतात. तहानलेल्यांना पाणी पाजून त्याची तृष्णा भागवण्यात फार मोठे पुण्य लाभते. यामुळे अनेक समाजसेवी संस्था, संघटनांतर्फे शहरातील चौकाचौकात प्याऊ लावण्यात येतात. रस्त्याने जाणाऱ्याला तहान लागली की तो या प्याऊमधील पाणी पिऊन पुढे जातो. मागील दोन वर्षापर्यंत शहरात प्याऊंची संख्या बऱ्यापैकी होती. परंतु यंदाच्या उन्हाळ्यात मात्र शहरातील अनेक प्याऊ बंद पडलेल्या अवस्थेत आढळून आले. ६३ प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाटभंडारा : उन्हाळ्याची दाहकता सुरू होताच जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १०.८५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात २४ टक्क्यानी घट झालेली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ या प्रकल्पात केवळ १२.१४ टक्के जलसाठा आहे. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ८़१५, बघेडा ६२़६७, बेटेकर बोथली निरंक आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे.़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ७़ ७० टक्के आहे़. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा १५.२९ टक्के आहे़ गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १३़ २०६ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी ६३ प्रकल्पात ४२.९०५ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ३५.२५ एवढी होती. पाण्याचा अपव्यय टाळा भंडारा : जिल्ह्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नसावी, असे वाटत असले तरी पाणी टंचाईची झळ पोहोचते. निसर्गाने भरभरुन दिलेल्या भंडारा शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात जाणवत असले तरी भविष्यात येथील नागरिकाना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचा पुर्नवापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची हीच वेळ आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुर्नवापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा शहरासह जिल्हाभरात पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात काही भागात पाणी येत नाही तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरडतात. ग्रामिण भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाऱ्याने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे मोठे आव्हान आहे. सामूहिक जबाबदारीसार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळ तोट्यांची तातडीने दुरुस्ती करा.येत्या पावसाळ््यात छतावर पडणाऱ्या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या.जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवनाची आवश्यकता आहे.नैसर्गिक जलस्रोत व टेकड्यांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून ग्रीन सिटी ही ओळख निर्माण करावी.
पाण्यासाठी पेटले रान, अधिकारी बेभान
By admin | Updated: May 11, 2015 00:15 IST