शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा बॅरेजमधून उद्योग समूहाला दिले जाते पाणी

By admin | Updated: May 5, 2016 00:56 IST

एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना वैनगंगेवरील बॅरेजमधून एका मोठ्या उद्योग समूहाला पाणी देणे सुरू असल्याचा प्रकार

मांडवी-धापेवाडा बॅरेज : खासदारांची चौकशीची मागणीतुमसर : एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना वैनगंगेवरील बॅरेजमधून एका मोठ्या उद्योग समूहाला पाणी देणे सुरू असल्याचा प्रकार मागील सहा दिवसांपर्यंत सुरू होता. कागदोपत्री पाणी बंद आहे तर प्रत्यक्षात बॅरेजमधून पाण्याचा उपसा सुरू होता. राज्य शासन व या उद्योग समूहाने चार वर्षापूर्वी वैनगंगा नदीवर मांडवी-धापेवाडा बॅरेज तयार केले होते. वैनगंगा नदी कोरडी पडली आहे. पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. बॅरेजमधून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.एप्रिल महिन्यात या बॅरेज धरणात १० एमएम क्युब पाणी शिल्लक होते, परंतु सद्य स्थितीत केवळ ३ एमएम क्युब पाणी शिल्लक आहे. उर्वरित पाणी येथे कुठे, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.२.५ एम.एम. क्युब पाणी १२ पाणीपुरवठा योजनेकरिता शिल्लक ठेवायचे आहे तर ५ एमएम क्युब पाणी शेतकऱ्यांकरिता राखीव ठेवायचे आहे. ३ एमएम क्युब पाणी बॅरेज मध्ये उपलब्ध असतानी पाण्याची उचल एका मोठा उद्योग समूहाने कशी केली. हा मुख्य प्रश्न आहे.१६ एप्रिल रोजी धापेवाडा सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांनी अदानी वीज समूहाला पाण्याचा उपसा बंद करण्याचे पत्र दिले होते. २४ एप्र्रिल पासून अदानी समूहाने पाण्याचा उपसा बंद केला, अशी माहिती अदानी समूहाने प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली परंतु वास्तविक स्थिती येथे दुसरीच होती. अदानी समूहाला या बॅरेजमधून १.५ एम एम क्युब पाणी देण्यात येते.२० एप्रिलच्या रात्रीपर्यंत बॅरेजमधून पाणी उपसा सुरू होता, अशी माहिती आहे. दरवर्षी ७ कोटी ५० लक्ष अदानी समूह शासनाला पाणी उपशाचे देते अशी माहिती आहे. अदानी वीज समूह व इतर पाणीपुरवठा योजनेकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. परंतु बावनथडी प्रकल्पात केवळ १० टक्के मृत जलसाठा उपलब्ध असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. बावनथडी धरणातील पाणी साठ्यावर मध्य प्रदेश शासनाचे नियंत्रण आहे. भंडारा व बालाघाटचे जिल्हाधिकारी संयुक्त निर्णयानंतरच पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. (तालुका प्रतिनिधी) अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नयेभंडारा : गायत्री एज्युकेशन सोसायटी, नागपूर व्दारा संचालित गायत्री पब्लिक स्कूल विद्यानगर, गुजराथी कॉलनी, गणेशपूर भंडारा येथे इंग्रजी माध्यमाचे वर्ग १ ते ६ हे अनधिकृत सुरु आहेत. सदर वर्गाला शासनाची मान्यता नाही, अशा अनधिकृत शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. सदर वर्गात प्रवेश घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालक व विद्यार्थ्यांची राहील, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. यांनी कळविले आहे.१६ एप्रिल रोजी अदानी समूहाला पाणी उपसा बंद करण्याचे पत्र दिले होते. २४ एप्रिल रोजी अदानी समूहाने पाणी उपसा बंद केला. नियमानुसार येथे कामे होतात. कागदोपत्री कामे होत नाही.-पद्माकर यासटवार, कार्यकारी अभियंता, तिरोडा.बावनथडी धरणात केवळ १० टक्केच मृत पाण्याचा साठा आहे. पाणीपुरवठा योजनेकरिता पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ते शक्य आहे. धरणावर मध्यप्रदेश शासनाचे नियंत्रण आहे.-आय.बी. राठोड, उपविभागीय अभियंता तुमसर.