शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर फुल-ग्रीन’ संकल्पना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:41 IST

सकाळची पहाट, वृक्षांवर किलबिलणारे पाण्यात झेप घेऊन तृष्णा भागविणारे पक्षी हा नैसर्गीक अनुभव घेता यावा. पाऊलवाटा वृक्षानी आच्छादाण्या हा स्वप्न वर्षभरात मोहाडीमध्ये कृतीत उतरला नाही.

ठळक मुद्देप्रसिद्धीची हाव मोठी : श्रमदान झाले महाग, नित्याचाच प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सकाळची पहाट, वृक्षांवर किलबिलणारे पाण्यात झेप घेऊन तृष्णा भागविणारे पक्षी हा नैसर्गीक अनुभव घेता यावा. पाऊलवाटा वृक्षानी आच्छादाण्या हा स्वप्न वर्षभरात मोहाडीमध्ये कृतीत उतरला नाही. त्यामुळे वॉटरफुल व ग्रीन मोहाडीची संकल्पना कागदावर अन् प्रसिद्धी पुरतीच होती काय असा सवाल मोहाडी करांना पडला आहे.मागील वर्षी कामगार दिनाच्या मुहूर्तावर एक दिवस मोहाडीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. मोहाडीच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वॉटर फुल अ‍ॅन्ड ग्रीन प्रोजेक्ट राबविण्यात येणार होता. जलसंधारणाची चळवळ उभी व्हावी या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी मागील वर्षी १ मे रोजी तहसिल कार्यालयाच्या समोरील कोल्हापूरी बंधाऱ्याजवळ श्रमदान करण्यात आले होते. या श्रमदानामुळे तालुक्यातील गावांना उर्जा देण्याचे कार्य होणार होते. श्रमदानानंतर त्या जागेवरच मुठमाती दिल्याचे दिसते.गाव हिताच्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून केलेल्या श्रमदानाच्या प्रारंभानंतर वॉटर फुल अ‍ॅन्ड ग्रीन मोहाडीची संकल्पना साकार करायला पुढे कोणीही आले नाही. तुमसर-मोहाडी क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे, तत्कालीन तहसिलदार धनंजय देशमुख, उपविभागीय अधिकारी शिल सोनुले, गटविकास अधिकारी किशोर पात्रीकर तसेच गावातील नगराध्यक्ष, नगरसेवक, युवक मंडळी, पत्रकार, महिला, युवती आदी जणांनी श्रमदानात सहभाग नोंदविला होता. श्रमदानानंतर जनप्रतिनिधी आमदार चरण वाघमारे, तहसलिदार धनंजय देशमुख यांचे मे महिन्यात स्थानांतरण झाले. त्यामुळे ही शाश्वत पाणी टंचाईवर मात करण्याची संकल्पना जागेवरच राहिली. व्यक्ती बदलल्या की सगळंच काही बदलत जाते. या बदलाचा परिणाम मोहाडी करांना भोगावा लागला.या सामाजिक हिताच्या कार्याला प्रारंभापूर्वीच मृतरूप बघायला मिळाले. तत्कालीन तहसिलदार देशमुख स्थानांतरीत झाले. दुसरे तहसिलदार सुर्यकांत पाटील आले. तहसिलदार, कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी मोहाडीचा विचार केला असता सकारात्मक पाऊले उचलली असती तर संकल्पना साकारण्यासाठी पुढची दिशा ठरविली असती, पुढाकार घेतला असता तर आमदार वाघमारे यांनी नक्कीच या नाविण्यपुर्ण कार्याला गती देण्यासाठी मदत केली असती. पण सारेच प्रशासनातील अधिकारी श्रमदानाच्या देखाव्या, झगमगाटानंतर या कार्यारंभासाठी दिशा ठरविताना कुठेच दिसली नाही.आज मोहाडीकरांना पिण्याचा पाण्यासाठी तरसावे लागते. तीन तीन दिवस नळ कोरडे असतात. पैसा देवून पाणी खरेदी करावे लागते. नगरपंचायतला मोहगाव देवीच्य सुर नदीवरउपाय योजना करण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो, असे तत्कालीन बंधाºयासाठी पैसा वाचावा यासाठी श्रमदानाची कल्पना प्रशासनाला सुचत नाही. पाण्यासाठी श्रमदान महाग झाला काय असा प्रश्न पडतो. १ मे हा एक दिवस मोहाडीसाठी राबविलेला उपक्रम दिशा देणारा होता, असेच म्हणावे लागेल.बदली झाल्याने त्या प्रोजेक्टरवर काम करण्याची संधी मिळाली नाही. आजही त्या प्रकल्पावर अंमलबजावणी करता येवू शकते. मोहाडीकरांनी सहभाग घ्यावा व आपुलकी निर्माण करावी.-धनंजय देशमुख,तत्कालीन तहसिलदार मोहाडी.