शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

पाण्याप्रमाणेच वन जीवन आहे

By admin | Updated: March 27, 2017 00:35 IST

सनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांना वनहक्काबाबत जाणिव व्हावी, यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे.

रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : वनहक्क कायद्याबाबत कायर्शाळा भंडारा : शासनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक यांना वनहक्काबाबत जाणिव व्हावी, यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे. आजघडीला वन कायदे मजबूत व कठीण होत आहेत, त्याची माहिती होणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे पाणी हे जीवन आहे तसेच वन हे सुध्दा जीवन आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या वतीने संरपच, सचिव मेळावा अंतर्गत वनहक्क कायद्याबाबत कार्यशाळेचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य कायर्कारी अधिकारी शरद अहीरे होते. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिल्पा सोनाले, दिलीप तलमले, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, उत्तमकुमार कळपते, अविल बोरकर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अवसरे म्हणाले, वनमंत्र्यांनी राज्यात २ कोटी पेक्षा जास्त वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करुन उच्चांक गाठला आहे. वन हे मानवी जीवनास आवश्यक आहेत. वनावर आधारीत व्यवसाय नागरिकांना मिळाला पाहीजे. सद्या वनात जावून मोह संकलन करणे तसेच इतर वन उपज संकलन करण्यास कायद्यानुसार अडचणी निर्माण झाल्या आहेत. म्हणून सामूहिक वनहक्क समिती गावात तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे वन मजूरास रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासोबतच या वनहक्क समितीद्वारे वनउपजापासून प्राप्त उत्पन्नातून गावाचा विकास करण्यात येणार आहे. वनहक्क समितीच्या माध्यमातून वन मजूरास रोजगाराचे हक्काचे माध्यम उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. शरद अहिरे म्हणाले, सी.एस.आर मधील सरंपच व सचिव यांना वनहक्काबाबत माहिती व्हावी, याउद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच कायर्शाळेत अंतिम टप्प्यात आपल्या शंकाचे निरसन करुन कामाला लागावे. जिल्ह्यात सिताफळ लागवडीचे कामे झाली आह, त्याचे सुध्दा सुक्ष्म नियोजन करावे, असेही ते म्हणाले. उमेश शर्मा यांनी वनहक्क कायद्याबाबत सांगतांना म्हणाले, हा उत्तम कायदा आहे, परंतु कायद्याच्या अंमलबजावणीस उशिर झाला आहे. या द्वारे मेळघाट सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात सामूहिक बायोगॅस सेवा सुरु करुन उर्जेची बचत करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सोपाकोंडा व नवाटोला येथे या कायद्याअंतर्गत उत्कृष्ट काम करण्यात आले आहे. त्याद्वारे गावकऱ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलबध झाल्या आहेत. सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवून नागरिकांचे राहणीमान उंचावणे हा सुध्दा या योजनेचा उद्देश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रास्ताविकात सामूहिक वनहक्क कायद्याबाबत माहिती दिली. वन क्षेत्रातील मजूरास रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद, महसूल व ही यंत्रणा सामुहिकरित्या कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत वनहक्क धारकाची कर्तव्ये, आदिवासी विकासासाठी वन हक्क कायदा कसा उपयोगी पडेल. शासनाचा सहभाग वन हक्क कायदा आणि आदिवासींचा विकास, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, आदिवासी विकास विभागाची कामे, वन हक्काच्या तरतुदी तसचे ग्रामसभाची कर्तव्ये, वन्यजीवन, वन आणि जैवविविधता समितीची स्थापना, संवर्धन व व्यवस्थापन आराखडयाबाबत तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचा अनेकांनी लाभ घेतला. या कायर्शाळेला अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसचिव, जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थित लक्षणीय होती. (नगर प्रतिनिधी)