शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

शहरात पाणीटंचाईचे संकट बळावले

By admin | Updated: May 26, 2017 01:57 IST

शहरातील ज्वलंत विषय ठरलेल्या पाणीपुरवठाचा प्रश्न नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. पिण्याचे पाणी मिळणे

महिलांची भटकंती : दूषित पाण्याने आजार फोफावलेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील ज्वलंत विषय ठरलेल्या पाणीपुरवठाचा प्रश्न नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने महिलांची भटकंती वाढली आहे. दुसरीकडे दुषित पाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शहरात १० हजारांच्यावर खाजगी नळधारक असून ३५० पेक्षा जास्त सार्वजनिक नळ आहेत. वैनगंगा नदीपत्रातून पाण्याचा पुरवठा होत असला तरी जलशुद्धीकरण करूनही मिळणारे पाणी दूषित आहे. दशकभरापासून भेडसावत असलेल्या या समस्येवर अजुनपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. नगरपालिकेत कुणाचीही सत्ता असो परंतु पाणी प्रश्नावर आजपर्यंत हा प्रश्न गांभीर्याने घेण्यात आला नाही. नवीन प्रस्ताव तयार करून विभागाकडे पाठविण्यात आला असला तरी त्यावर निर्णय झालेला नाही. जुन महिना लागायला पाच दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येवून ठेपले असतानाही पालिका प्रशासनाने मुलभूत घटक असलेल्या पाण्याच्या मुद्यावर गंभीरतेने निर्णय घेतलेला दिसून येत नाही. नगरपालिकेत किंबहूना राज्यातही भाजपची सरकार आहे परंतु शंभर सव्वाशेकोटी रूपयांची योजना आणायला किंवा निधी उपलब्ध करायला एवढा कालावधी लागत असेल तर सत्ता कुठल्या कामाची असाही प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.कालबाह्य झालेली जलवाहिनीचार दशकांपुर्वी पाण्याची जलवाहिनी घालण्यात आली होती. परिणामी ही जलवाहीनी कित्येक ठिकाणाहून लिकेज आहे याची नेमकी माहितीही पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नाही. प्रत्येक ठिकाणी खड्डा खोदून ठेवणेही शक्य नाही. अशा स्थितीत कालबाह्य झालेली जलवाहिनी उखाडून फेकणे हाच एकमेव पर्याय आहे. पाणी पुरवठ्याच्या भविष्यकालीन योजनावर सर्वेक्षणही झाले आहे. प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबी प्रकर्षाने मंजूर करून आगामी काळात त्यावर काम सुरू होणे महत्वाचे आहे. मेंढा येथे पाण्यासाठी हाहाकारशहरातील उत्तर-पुर्व दिशेला वसलेल्या व नेहरू वॉर्डात व गौतम बुद्ध वॉर्ड परिसरात मागील दहा दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील काही वॉर्डामध्ये नगरसेवकांच्या मदतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मेंढा परिसरात किमान टँकरनेतरी पाणीपुरवठा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. वॉर्डातील नगरसेवक या गंभीर समस्येकडे लक्ष देतील काय, असा सवाल वॉर्डवासी विचारीत आहे.