शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांना गुरुवारी भंडारा येथे घेराव घालण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ...

ठळक मुद्देनाना पटोले : शेतकऱ्यांचा धान खरेदी करा, १६ तास वीज द्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांना गुरुवारी भंडारा येथे घेराव घालण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शेतकरी शेतमजूर आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यानंतरही जिल्ह्याची आणेवारी ५० पेक्षा अधिक आली. त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या मदतीला मुकत आहेत. उघड्यावर असलेला धान पावसात ओला झाला. त्याला कोंब फुटले. परंतु आता तो धान खरेदी करण्यास पणन महासंघ नकार देत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ज्या स्थितीत शेतकऱ्यांचा धान आहे. त्या स्थितीत तो खरेदी करावा, धान खरेदीचे पैसे तात्काळ द्यावे, यासोबतच ग्रामीण भागात शेती सिंचनासाठी केवळ आठ तास वीज पुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांपुढे अडचणे निर्माण झाले आहे. या शेतकऱ्यांना १६ तास वीज पुरवठा करावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीची भंडारा येथे गुरुवार १७ जानेवारी सभा होत आहे. यासाठी पालकमंत्री भंडारा येथे येत आहे. त्यावेळी शेतकºयांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.