शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

तुमसरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: June 22, 2016 00:28 IST

जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही.

श्रीरामनगरातील बोअरवेल बंद : तुमसरकरांना सोडले वाऱ्यावर, नगरसेवकांचा आरोपतुमसर : जिवनदायनी वैनगंगेचे पाणी आटल्याने तुमसर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या मोटार पंपात रेती शिरली व तांत्रीक बिघाड झाला त्यामुळे नळांना पाणी आलेच नाही. तर दुसरीकडे संपुर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी श्रीराम नगरातील बोअरवेलच्या पंपात बिघाड आला. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होवू शकत नसल्यामुळे तुमसरात पिण्याच्या पाण्यासाठी गत दोन दिवसापासून हाहाकार माजला. असतांना मुख्याधिकाऱ्यानि मात्र कार्यालयातून लापता राहून तुमसरकरांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप संतप्त नगरसेवकांनी केला आहे. पावसाने दगा दिल्याने तालुक्यातील सर्व तलाव, विहिरीने तळ गाढले. साधारणत: मार्च महिण्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होत असते. मात्र तुमसर तालुक्यात डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची चणचण भासणे सुरु झाली. मात्र जिवनदायनी वैनगंगेने तुमसरकरांना ती चणचण भासू दिली नव्हती. परंतू जसजसी उष्णता वाढू लागली तसतसी वैनगंगाही आटू लागताच न.प. ने पाण्याचे स्त्रोत बदलविले व पाणी पुरवठा केला. दरम्यान तुमसरातील नगरसेवकांनीही पाण्याचा धर्म पाळत. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये. म्हणून टँकरची व्यवस्था करुन श्रीराम नगरातील बोअरवेल पाणी शहरात वाटप केले. निवडणुकीचा अपवाद वगळता नगरसेवक मौलाचे कार्य करीत होते. त्यामुळे मुख्याधिकारी हे बेफिर होवून वावरत होते. त्यामुळे कार्यालयात दोन दोन तिन तिन दिवस गैरहजर राहणे हे त्यांच्या नित्याचे झाले. एकीकडे नागरिकांकडून पाणी पट्टी कराच्या नावावर कडक मोहीम राबवून जबरान कर वसूली करण्यात आली पंरतु न.प. प्रशासनाची शहरात एकही कर वसूली पथक फिरकले नाही. खुद नगरसेवकांनी पुढाकार धेवून व पैसे खर्च करुन पाणी वाटप करित असतांना मुख्याधिकाऱ्यांचा बेफिकीरपणा नगर सेवकांना पवनी व पडल्याने नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच रोष दर्शविला होता व पुढे येणाऱ्या अडचणीही सांगितल्या होत्या. परंतू मुख्याधिकारी गुल्हाणे यांनी कानाडोळा केला व आजघडीला तुमसर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगेचे पात्र आटले व मोटारपंपात रेती शिरल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. तर दुसरीकडे ज्या बोअरवेल मधील पाणी टँकरमध्ये भरला जायचा तिचीही मोटार बंद पडल्याने टँकरनेही पाणी पुरवठा बंद झाला आहे. असे असताना मुख्याधिकारी लापता आहेत. त्यावरुन मुख्याधिकारी किती कर्तव्यदक्ष आहेत हे दिसून आले. आहे. असा आरोप पक्षनेता प्रमोद तितीरमारेनी पिण्याच्या पाण्याची समस्या ही जर वेळीच निकाली निघाली नाही तर तुमसर न.प. वर काँग्रेसच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांची प्रतिक्रिया घेण्याबाबत दुरध्वनी केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. (शहर प्रतिनिधी)