शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गोदाम, बारदान्याअभावी खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

लाखनी येथील धान खरेदी केंद्रावरील खरेदी विक्री संस्था गोदामात सहा हजार ७४३ क्विंटल धान जमा झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात नऊ हजार ८३६ क्विंटल व निर्धनराव वाघाये पाटील बासमती राईस मिलच्या गोदामात एक हजार ७३६ क्विंटल धान खरेदी करून जमा आहे. लाखनी व परिसरातील ५६९ शेतकऱ्यांचा १८ हजार ३१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे. सालेभाटा येथे विविध कार्यकारी संस्थांचे गोदामात एक हजार ३५६ क्विंटल धान खरेदी केली आहे.

ठळक मुद्देविक्रीअभावी शेतकरी त्रस्त : लाखनी येथील खरेदी विक्री संस्थेने केले ७० हजार क्विंटल धान खरेदी

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथील सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेद्वारे खरीप धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र सध्यस्थितीत गोदाम व बारदान्याअभावी आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी ठप्प झाली आहे. अंदाजे ३० ते ४० हजार क्विंटल धान खरेदी केंद्राच्या बाहेर खरेदीविना पडून आहे. खरेदी विक्री संस्थेद्वारे २७ डिसेंबर अखेरपर्यंत ७० हजार ४५२ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.लाखनी येथील धान खरेदी केंद्रावरील खरेदी विक्री संस्था गोदामात सहा हजार ७४३ क्विंटल धान जमा झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात नऊ हजार ८३६ क्विंटल व निर्धनराव वाघाये पाटील बासमती राईस मिलच्या गोदामात एक हजार ७३६ क्विंटल धान खरेदी करून जमा आहे. लाखनी व परिसरातील ५६९ शेतकऱ्यांचा १८ हजार ३१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे. सालेभाटा येथे विविध कार्यकारी संस्थांचे गोदामात एक हजार ३५६ क्विंटल धान खरेदी केली आहे.गोंडसावरी येथील सोसायटीच्या गोदामात एक हजार ४३० क्विंटल, राजेगाव येथील सोसायटीच्या गोदामात दोन हजार चार क्विंटल, सुशील डोंगरवार यांच्या बोरगावच्या गोदामात सहा हजार ८१३ क्विंटल, पिंडकेपार येथील सोसायटी गोदामात पाच हजार २३८ क्विंटल, एकोडी परिसरातील ७४९ शेतकऱ्यांकडून १४ हजार १०१ क्ंिवटल धान खरेदी केला आहे.जेवनाळा खरेदी केंद्रामध्ये कनेरी येथे एक हजार ४१३ क्विंटल, गुरठा गोदामात एक हजार ५५७ क्विंटल, गोंडेगाव गोदामात एक हजार ४२९ क्विंटल असा एकूण १७४ शेतकºयांकडून खरेदी करण्यात आला आहे.परसोडी खरेदी केंद्रावर बाबुराव भाजीपाले यांच्या गोदामात दहा हजार ८९३ क्विंटल, ताराचंद भाजीपाले यांचे उमरी गोदामात आठ हजार २२४ क्विंटल, उमरी येथे भाष्कर कापगते यांच्या गोदामात एक हजार ५०७ क्विंटल असे एकूण ७०७ शेतकºयांकडून २० हजार ६२६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. सातलवाडा खरेदी केंद्रावर लोकचंद राऊत यांच्या गोदामात आठ हजार २१७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात लाखनी येथील साकोली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीद्वारे धान खरेदती द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. गोदामाची असलेली कमतरता यामुळे धान खरेदी थांबवावी लागली आहे. मार्केटिंग फेडरेशनने मालाची उचल केल्यानंतर धानाची खरेदी शक्य होणार आहे.गोदामाची संख्या वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे खरेदी विक्री संघाचे सभापती घनश्याम पाटील खेडीकर यांनी सांगितले. गोदामाबाहेर असलेला शेतकऱ्याचा धान अवकाळी पावसाने भीजला आहे. धानाला सरकारने बोनस दिल्याने धान उत्पादक शेतकºयांचा आधारभूत खरेदी केंद्रावर विक्रीकरिता कल वाढला आहे.

टॅग्स :agricultureशेती