शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

इतर राज्यातही कार चालवायची? मग 'बीएच' सिरीज घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:58 IST

Bhandara : अन्य राज्यांत बदली होणाऱ्यांना फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आता वाहन नोंदणीची बीएच सिरीज सुरू करण्यात आली आहे. यामुळे राज्य बदलले तरी आता वाहनांचे नंबर बदलावे लागणार नाहीत. भंडारा जिल्ह्यात दोन वर्षांपासून ही सिरीज सुरू झाली आहे, या अंतर्गत आता वाहनांची नोंदणीही सुरू झाली आहे.

वाहनांचे राज्यांदरम्यान स्थलांतरण सुलभतेने व्हावे, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, आता चारचाकी वाहनांच्या नोंदणीकरिता भारत मालिका (बीएच सिरीज) ही नवी नोंदणी मालिका सुरू केली आहे. नव्या 'बीएच' सिरीजचा सर्वाधिक फायदा हा केंद्रीय कर्मचारी तसेच राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.

तसेच ज्या व्यक्तींची सातत्याने परराज्यात बदली होते, अशा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही सिरीज महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे चारचाकी वाहन चालकांना नंबर बदलविण्याचे कटकट संपणार आहे . 

बीएच सिरीजसाठी कोण करु शकतो अर्ज? 

  • वाहन चालकांना बीएच सिरीज हवी असल्यास त्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असावा. जर तुम्ही दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असेल तर तुम्हीही बीएच सिरीज घेऊ शकता.
  • बीएच सिरीजसाठी परिवहन मंत्रालयाच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. 
  • वाहन डीलरच्या मदतीने देखील नोंदणी करू शकतो. नोंदणी करताना विचारण्यात आलेले सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे तेवढेच आवश्यक आहे.

असे असणार नंबरनवीन सिरीजची सुरुवात बीएच या अक्षराने सुरु होईल. त्याआधी रजिस्ट्रेशन वर्ष असेल. उदाहरणार्थ, २०२१ मधील २१ अंक तिथे असेल, बीएच हा भारत सिरीज कोड आहे. त्यानंतर ४ अंकी क्रमांक राहील. शेवटी राज्याचे शब्द राहतील.

दोन वर्षांपर्यंत रोड टॅक्स भरता येणार 

  • आता बीएच सिरीजसाठी दर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरावा लागणार आहे. वाहनाची नोंदणी डीलरकडेच होईल. त्यामुळे त्यांच्याकडेच हा टॅक्स भरावा लागतो. नोंदणी झाल्याशिवाय वाहन रस्त्यावर येऊ शकत नाही. 
  • देशात बीएच सिरीज दोन-तीन वर्षापासून सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात बीएच सिरीज प्रणाली सुरू झाली आहे. या बीएच सिरीजची मागणी भंडारा जिल्ह्यात मात्र फारसी दिसत नाही. 
  • मागील दोन-तीन वर्षांपासून ही सेवा सुरू झाली आहे. आतापर्यंत शेकडो वाहनांना बीएच सिरीज क्रमांक देण्यात आला आहे. 
  • जिल्ह्यात चारचाकी वाहनांची खरेदी होत असते. परंतु, मोठ्या शहराच्या तुलनेत मागणी कमी होत आहे.

"भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत अनेक वाहनांची नोंदणी या बीएच सिरीज अंतर्गत झाली आहे. बीएच सिरीजचे वाहन संपूर्ण देशात जाऊ शकते. त्यासाठी संबंधित संस्था, कंपनी यांचे दोन राज्यांमध्ये किमान चार कार्यालये किंवा आस्थापना असणे आवश्यक आहे." - राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा, 

टॅग्स :bhandara-acभंडारा