शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जगप्रसिद्ध मॅग्निज खाणीच्या तालुक्यात बेरोजगारांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

तुमसर तालुक्यात अनेक उच्चशिक्षित विद्यार्थी आहेत. मात्र स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी नसल्याने त्यांना महानगर गाठावे लागते. तर आयटीआय सारखे प्रशिक्षण घेऊनही अनेक तरुण लघु व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. नोकरीची आशा नसल्याने निराश झालेले तरुण तुमसर तालुक्यात ठिकठिकाणी दिसतात. काही तर नशेच्या आहारीही गेल्याचे दिसून येते. मात्र त्यांना रोजगार दिला जात नाही.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जगप्रसिद्ध दोन मॅग्निज खाणी असलेल्या तुमसर तालुक्यातील बेरोजगारांना येथे रोजगार मिळत नाही. उलट खाणींमध्ये परप्रांतीय कामगारांचाच भरणा केला जातो. त्यामुळे त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी भटकंती करावी लागते. अनेक तरुणांनी कामाच्या शोधात महानगर गाठले आहे, तर स्थानिक कंत्राटी कामगारांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. चिखला व डोंगरी बु. येथे जगप्रसिद्ध मॅग्निज खाण असून, तुमसर तालुक्यात बेरोजगारांची संख्या मात्रमोठी आहे. खाणीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही अशी ओरड कायम असते. दोन्ही मॅग्निज खाणीत सुमारे दोन हजार कामगार कंत्राटी पद्धतीने कामे करीत आहेत. खाणीच्या डोलारा कंत्राटी कामगारांवर अधिक आहे. नियमित कामगारांची येथे संख्या कमी असून, काही कंत्राटी कामगार स्थानिक आहेत.  स्थानिक नियमित कामगारांची संख्या नगण्य आहे.मॅग्निज खाणीत परप्रांतीयांचा भरणा अधिक असल्याची ओरड आहे. कामगारांची भरती वरिष्ठ स्तरावरून होते असे सांगण्यात येते त्यामुळे येथील स्थानिक अधिकारी काहीच करू शकत नाही. परंतु नियमानुसार स्थानिकांना येथे मॅग्निज खाणीत सामावून घेण्याची गरज आहे. अनेकदा यासाठी स्थानिकांनी आवाज उठविला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नियमानुसार भरती करण्यात येते तसेच मॉयल प्रशासनाकडून सांगण्यात येते. तुमसर तालुक्यात अनेक उच्चशिक्षित विद्यार्थी आहेत. मात्र स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी नसल्याने त्यांना महानगर गाठावे लागते. तर आयटीआय सारखे प्रशिक्षण घेऊनही अनेक तरुण लघु व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. नोकरीची आशा नसल्याने निराश झालेले तरुण तुमसर तालुक्यात ठिकठिकाणी दिसतात. काही तर नशेच्या आहारीही गेल्याचे दिसून येते. मात्र त्यांना रोजगार दिला जात नाही.

मॅग्निज साठा आणखी १०० वर्षे पुरेल एवढा - डोंगरी व चिखला येथील खाणीत पुन्हा शंभर वर्षे पुरेल एवढा मॅग्निज साठा भूगर्भात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येथे स्थानिक बेरोजगारांना सामावून घेण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. स्थानिक बेरोजगारांना येथे रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यात  असंतोष  आहे. मॅग्निज खाणीत भरतीप्रक्रिया करताना स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे.खान परिसराचा विकास ‘शून्य’- डोंगरी व चिखला ही गावे जगप्रसिद्ध मॅग्निज खाणीमुळे झाली. परंतु या दोन्ही गावांचा विकास मात्र शून्य आहे. वर्षानुवर्षे ही गावे जशी होती तशीच आहेत. दुसरीकडे खान प्रशासन सीएसआर निधी देतो, परंतु स्थानिक गावात मात्र उल्लेखनीय असे कोणतेही कार्य अजूनपर्यंत झालेले नाही. तालुका बाहेरील शहराला व गावांना सीएसआर निधी देण्यात येतो. हे विशेष.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी