शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

भटक्या विमुक्तांनी संघटित व्हावे

By admin | Updated: March 14, 2016 00:29 IST

६२ जातींमध्ये विखुरलेल्या भटक्या विमुक्त समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विकास साधायचा असेल तर भटक्या विमुक्त प्रवर्गातील ...

संघर्ष वाहिनीची बैठक : दीनानाथ वाघमारे यांचे आवाहनभंडारा : ६२ जातींमध्ये विखुरलेल्या भटक्या विमुक्त समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विकास साधायचा असेल तर भटक्या विमुक्त प्रवर्गातील समाजाने संघटीत होण्याची काळाची गरज आहे, असे आवाहन संघर्ष वाहिनीचे प्रमुख दीनानाथ वाघमारे यांनी केले.भंडारा येथे आज रविवारी आयोजित जिल्हा संघर्ष वाहिनीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चा संदर्भात विचारमंथन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शंकरराव फुंड होते. प्रमुख उपस्थितींमध्ये बेलदार समाजाचे संघटक मुकुंद अडेवार, के.एन. नान्हे, प्रकाश पचारे, प्रकाश हातेल, राजेश येलशट्टीवार, योगेश दुधपचारे, व्ही. डी. मारबते, यशवंत दिघोरे, लोकेश नगरे, गोविंद मखरे, राजु शिवरकर, प्रमिला मेश्राम, यावलराव मारबते, अशोक शेंडे, हेमंत बावणे, चंद्रभुषण धोबळे, रेखा मोहनकर, के. डी. कांबळे, तुलराम कराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.मुंकूद अडेवार म्हणाले, जोपर्यंत एन टी प्रवर्गातील नागरिक रस्त्यावर उतरून एकजुटता दाखविणार नाही, तोपर्यंत शासन आपल्याला हक्क देणार नाही. प्रकाश पचारे म्हणाले समाजातील शिक्षीत वर्गातील लोकांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करावा. समाजाचे संघटन मजबूत करुन समाज विकास कार्यात हातभार लावावा. के. एन. नान्हे म्हणाले, संघर्ष वाहिनीने उभारलेल्या लढ्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील समाज बांधवात नवचैतन्य निर्माण झाले आहे. भविष्यात या समाजाने पेटून उठण्याची गरज आहे. आपल्या हक्काकरिता समाज बांधवाना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला भंडारा गोंदिया जिल्हयातील ढिवर, बेलदार, धनगर, गायकी, नाथजोगी, पारधी, बंजारा, वडार आदी समाजातील बांधव उपस्थित होते. बैठकीचे संचालन रुपेश भांडारकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश पचारे यांनी केले. (प्रतिनिधी)