शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार रकमेच्या विनियोगाला वाळवी

By admin | Updated: August 10, 2015 00:25 IST

महाराष्ट्र शासनाने २००७ पासून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त गावांना दिलेल्या ...

तंटामुक्त गाव मोहीम : 'मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर' सारखा प्रकारभंडारा: महाराष्ट्र शासनाने २००७ पासून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त गावांना दिलेल्या पुरस्कार रकमेच्या विनियोगाला गैरप्रकाराची वाळवी लागली आहे. पुरस्कार रकमेच्या विनियोगात ग्रामपंचायतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करताच मनमानी खर्च केला. काही ग्रामपंचायतींची पुरस्काराची रक्कम सामान्य फंडात अद्याप अखर्चित आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त गावांना लोकसंख्येच्या आधारावर लाखो रूपयांचे पुरस्कार दिले जातात. मात्र या योजनेची अवस्थाच आता जणू 'मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर' अशी झाल्याचे दिसून येत आहे. गाव तंटामुक्त करण्यासाठी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, निमंत्रक व समिती सदस्यांनी योजनेची प्रसिद्धी, प्रचार व गावातील प्राप्त तंटे मिटविण्यापासून ते प्रतिबंधात्मक योजना, विविध उपक्रम राबवून, दप्तर लिहून जवळून खर्च करून आपले गाव मूल्यमापनात यशस्वी करीत पुरस्कार प्राप्त केले. संबंधित ग्रामपंचायती त्यावर 'छदाम'ही खर्च करीत नाही. ग्रामपंचायतीने ग्रामसभेतून तंटामुक्त गाव समिती स्थापन करून मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला जातो. १ मे रोजी गाव तंटामुक्त झाल्याचा अहवाल तेवढा पोलीस ठाण्याला पाठवून ग्रामपंचायतींतर्फे सोपस्कर तेवढे पार पाडले जातात. यात काही गावांचा अपवाद असू शकतो. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी व गाव तंटामुक्त करण्याची सर्वस्वी जबाबदारी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व निमंत्रकासह सदस्य पार पाडतात. मात्र मिळणाऱ्या तंटामुक्त गाव पुरस्काराची रक्कम तंटामुक्त गाव समितीला न मिळता ग्रामपंचायतीच्या नावे धनादेशाद्वारे देण्यात येते. त्यामुळे पुरस्काराने ग्रामपंचायतीचेच चांगभले होते. गाव तंटामुक्त होऊन गावाला पुरस्कार मिळाल्याचा व सन्मानित होण्याचा औटघटकेचा आनंद तेवढा तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष व निमंत्रकांना मिळतो. वास्तविक पुरस्काराची रक्कम तंटामुक्त गाव समितीलाच मिळणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. पुरस्काराच्या रक्कमेचा धनादेश ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडात जमा होऊन ती रक्कम खर्च करण्याचे अधिकार सरपंच, सचिवांना देण्यात आले आहे. तेथूनच पुरस्कार रकमेला वाळवी लागली आहे. या पुरस्कार रकमेचा विनियोग करण्यासाठी शासनाने परिशिष्ठ ७ अन्वये काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पुरस्कार रकमेतून विविध उपक्रमांवर खर्च करण्याचे निर्णय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला शासन मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून करण्याचे निर्देश आहेत. तथापि, ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानुसार पुरस्कार रकमेचा विनियोग करून खर्चाचे हिशेब ठेवणे, ग्रामसभेला अहवाल सादर करणे व शासकीय यंत्रणांना याबाबत आवश्यक ती माहिती पुरविण्याची जबाबदारी ग्रामसेवकामार्फत तंटामुक्त गाव समितीकडे सोपविण्यात आली आहे. मात्र ग्रामपंचायती या खर्चाबाबत तंटामुक्त गाव समितीला विश्वासात घेत नसून समितीला अंधारात ठेवूनच हा खर्च केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. शासनाच्या सुचनेप्रमाणे पुरस्कार रकमेचा ग्रामपंचायतीकडून केलेल्या खचार्ची कालबद्ध तपासणी व नियंत्रणाचे अधिकार तालुका समिती अध्यक्ष, तहसीलदार, संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेदार व गटविकास अधिकाऱ्यांना आहे. ग्रामपंचायतीच्या लेखा परीक्षणबरोबर पुरस्कार निधी खर्चाचे लेखा परीक्षण केले जाणे आवश्यक आहे. तथापि याबाबत तालुका समितीच अनभिज्ञ आहे. तालुका समितीचे सचिव म्हणून ठाणेदारांकडून संबंधितांना जमा-खर्चाचा अहवाल मागितला जातो. मात्र अनेकांनी खर्चाचा अहवाल दिलाच नाही. यावरून या खर्चात ग्रामपंचायतीने अनागोंदी केल्याचे स्पष्ट होत आहे. (नगर प्रतिनिधी)खर्च केला जातोय भलत्याच कामांवर पुरस्कार रकमेच्या विनियोगाची काही ग्रामपंचायतीची पडताळणी केली असता, अनेक ग्रामपंचायतीने शासन निर्देशालाच हरताळ फासून गावात दर्शनी कमानी उभारल्याचे दिसून आले. पुरस्कार रकमेतून वृक्ष संवर्धनास ट्री गार्ड, सिमेंट नाली दुरूस्ती, सिमेंट नाली बांधकाम, कचरापेट्या खरेदी, वाढीव पाईपलाईनसह इतर बाबीवर खर्च केल्याचेही दिसून येते. ही कामे या रकमेतून करणे अपेक्षित नाही. वास्तविक या रकमेचा विनियोग शासन मार्गदर्शक सूचनाप्रमाणे होणे अपेक्षित आहे. मार्गदर्शक सूचनांचे परिशिष्ठ ७ चे पत्रक पुरस्कार प्राप्त सर्वग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. तालुका, जिल्हा समितीने विशेष लक्ष देऊन पुरस्कार रकमेच्या विनियोगवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच तंटामुक्त गावांना मिळणारे पुरस्कार तंटामुक्त गाव समित्यांना मिळावे, अशी मागणी आजी, माजी तंटामुक्त गाव समित्यांच्या अध्यक्ष निमंत्रक व समिती सदस्यांकडून होत आहे.