शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

अडीच हजारावर शेतकरी कृषिपंपासाठी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकºयांना त्वरित वीज जोडणी करुन देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यातील २८२० शेतकरी मागील मागील दीड वर्षांपासून कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित असल्याचे ...

ठळक मुद्देदीड वर्षापासून पायपीट कायम : विद्युत वितरण कंपनीचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकºयांना त्वरित वीज जोडणी करुन देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यातील २८२० शेतकरी मागील मागील दीड वर्षांपासून कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित असल्याचे चित्र आहे.सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे. शेतकºयांना विहीर देण्यासाठी शासन तत्पर आहे. परंतु या विहिरीतील पाणी शेतपिकांना देण्यासाठी विद्युत कनेक्शन देण्यास विद्युत वितरण कंपनी अपयशी ठरली आहे. धान हेच जिल्ह्यातील मुख्य पीक असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती धानपिकावरच अवलंबून आहे.धानाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मागील दोन-तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे. दरवर्षी कर्ज घेऊन चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगविणाºया शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य होत नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी शेतपीक वाया जात आहे. तर उन्हाळी पिकांची लगावड करण्याचे स्वप्न यंदा केवळ स्वप्नच राहिले.जिल्ह्यातील तीन हजाराच्या घरात शेतकºयांनी कृषीपंपाकरीता विद्युत वितरण विभागाकडे अर्ज करुन कृषीपंपासाठी वीज कनेक्शन मागीतले. परंतु मागील दीड वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकºयांना अद्यापही वीज जोडणी करुन देण्यात आली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक वाया गेले.गोंदिया तालुक्यातील ४९३, गोरेगाव तालुक्यातील ४३४, तिरोडा ४५६, आमगाव १४८, सालेकसा २३७, देवरी २३३, सडक-अर्जुनी ३१२, अर्जुनी-मोरगाव ५०७ अशा एकूण शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनकरीता डिमांड भरले आहेत. परंतु त्यांना विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन दिले नाही. त्यामुळे वीज जोडणी केव्हा करुन मिळणार यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित आहेत.टेंडरच्या नावावर टाळाटाळशेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी मागील दीड वर्षापासून टाळाटाळ केली जात आहे. कृषिपंपाचे कनेक्शन देण्यासाठी कंत्राट देण्याची टेंडर प्रक्रिया सुरु असल्याचे सर्व शेतकऱ्यांना सांगून मागील वर्षभरापासून एकच पाढा विद्युत वितरण कंपनी वाचत आहे. टेंडर प्रक्रिया सुरु असल्याच्या नावावर शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.वर्षभरापासून मोटारपंपासाठी कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले. परंतु वर्ष लोटूनही अद्यापही कनेक्शन न दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे.प्रेमलाल बोहरे- साखरीटोला (सातगाव),

टॅग्स :agricultureशेती