शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

माडगी तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 25, 2015 01:50 IST

मिनी पंढरी तथा मिनी कन्याकुमारीची उपमा देवून लौकीक वाढविलेल्या माडगी (तुमसर) देव्हाडा येथे नृसिंह यात्रा महोत्स्व सुरु झाले आहे.

मंदिराच्या पायऱ्या पाण्यात : टेकडीमार्गे मंदिरात करावा लागतो प्रवेशकरडी (पालोरा) : मिनी पंढरी तथा मिनी कन्याकुमारीची उपमा देवून लौकीक वाढविलेल्या माडगी (तुमसर) देव्हाडा येथे नृसिंह यात्रा महोत्स्व सुरु झाले आहे. वैनगंगेच्या नदीपात्रात मध्यभागी २०० फुट शिळेवर लक्ष वेधून घेणारे नृसिंह, विरसिंहाचे जागृत मंदिर आहे. मागील साठ वर्षात या धार्मिक पर्यटन स्थळाची उपेक्षा सुरु आहे. जिल्हा विकास निधीतून आतापर्यंत केवळ सहा लाख रुपयांचा निधी येथे प्राप्त झाला आहे.अमावस्यापासून पोर्णिमेपर्यंत १५ दिवस माडगी(तुमसर) येथे भगवान नृसिंह, विरसिंह मंदिर परिसरात यात्रा भरते. जागृत मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिध्द आहे. तुमसर तालुक्यासह भंडारा, गोंदिया जिल्हा व छत्तीसगढ, मध्यप्रदेशातील भाविक येथे मोठ्या संख्येने येतात. दगडी टेकडी फोडून वैनगंगेच्या प्रवाहाला मोकळा वाट नृसिंह व विरसिंहांनी करुन दिल्यानेच परिसरात महाप्रलय बंद झाले होते, अशी आख्यायीका आहे. भगवान राम, लक्ष्मण व सीता येथे वनवासाप्रसंगी काही काळ व्यास्तव्यास होती, अशीही आख्यायीका आहे. विस्तीर्ण नदीपात्र, स्वच्छ पाणी, राज्य महामार्गाचे व रेल्वे मार्गाचे जाळे व गाड्यांची रेलचेल हे या धार्मिक व पर्यटनीय स्थळाचे वैशिष्ट्ये आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, राज्य शासन व केंद्र शासनाचे येथे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेच्या व विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित होण्यापासून दुर्लक्षित आहेत. परंतु गंगेकडे एकही योजना प्रस्तावित नाही.तुमसर शहरापासून १० किमी अंतरावर असलेले हे धार्मिक व पर्यटन स्थळ उपेक्षित आहे. या स्थळाला अनेक प्रतिनिधींनी भेट दिल्या, कुणी या स्थळाला मिनी पंढरी तर कुणी मिनी कन्याकुमारीची उपमा देवून गेले. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी, विस्तीर्ण जलपात्र यामुळे येथे बोटींगची व्यवस्था होऊ शकते. स्थळाचे सौंदर्यीकरण होवू शकते. मात्र या सुविधांकडेही कायमचे दुर्लक्ष होत आहेत. पतीत पावन स्थळाच्या विकासातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. आतापर्यंत मंदिराच्या पायऱ्यांचे बांधकामाशिवाय संरक्षण भींत तयार करण्यात आली. भक्त निवासाची सोय नाही.धापेवाडा, माडगी बॅरेजमध्ये पाणी अडविल्याने या गोसीखुर्दचा बॅक वाटरमुळे माडगी येथे मुबलक पाणी आहे. सध्या मंदिराच्या पायथ्याशी पाणी आहे. त्यामुळे दगडी टेकडीवर मंदिरात जावे लागते. वृध्द महिला पुरुषांना मंदिरात जाण्यास अडचण होत आहे. (वार्ताहर)