शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त मोबदल्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 2, 2016 00:59 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बांधतांना १,१९९.६० कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करण्यात आले होते.

शासन निर्णयाला केराची टोपली : अधिकाऱ्यांचा कारभारपुरुषोत्तम डोमळे सानगडीविदर्भातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बांधतांना १,१९९.६० कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज मंजुर करण्यात आले होते. यापैकी भंडारा व नागपुर जिल्ह्यातील ११ हजार १२९ कुटुंबापैकी ७ हजार ३१५ कुटुंबांना लाभ देण्यात आला. उर्वरितांना नोकरीऐवजी एकरकमी मोबदला देण्यासाठी शासनाने निर्णय क्रमांक नुसार अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे. परंतु आजतागायत वाढीव कुटुंबांना व रिक्त भूखंड धारकांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात आला नसल्यामुळे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे. यानुसार प्रकल्पबाधीत १८ हजार ४४४ कुटुंबांना नोकरीऐवजी एकमुस्त रक्कम देण्याचे शासनाने निश्चित केले होते. स्वतंत्र वाढीव कुटुंबांना लाभ देण्यासाठी विहीत नमुनेतील शपथपत्र, शपथपत्र करणाऱ्याचे ओळखपत्र, २१ मार्च १९९७ पूर्वी स्वतंत्र कुटुंब असल्याबाबत विधानसभेच्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारयादीची नक्कलप्रत, विवाह झाल्याबाबत लग्नाचे प्रमाणपत्र, नावात बदल केल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा २१ मार्च १९९७ पूर्वीचा जन्माचा दाखला, स्वतंत्र कुटुंब गावात राहत असल्याचा दाखला यासह अनेक जाचक अटीचा समावेश असल्यामुळे घेतले. त्या शिबिरात काहींनी शपथपत्र भरुन दिले तर काहींनी शपथपत्र भरुन दिले नाही. तसेच रिक्त भूखंडधारक प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी एकमुस्त २ लाख ९० हजार रुपयांचा लाभ देण्यात यावा, असे शासन आदेशात नमूद असतानाही उपविभागीय अधिकारी भंडारा तसेच पुनर्वसन अधिकारी भंडारा यांच्या अडेलटटू धोरणामुळे आजपर्यंत लाभ देण्यात आला नाही.असा मिळणार होता लाभनोकरीऐवजी एकमुस्त रक्कम म्हणून २.९० हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार होते. एका कुटुंबाच्या नावावर एकापेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या पैकी १ हजार १४५ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. एका घरावर एकापेक्षा जास्त कुटुंबांची नावे आहेत अशापैकी काहींना लाभ मिळाला असून आता उर्वरितांना लाभ मिळणार. निवाड्यानुसार कुटुंबाचे नावे रिक्त भूखंड दर्शविण्यात आले असून त्यांनासुध्दा एकमुस्त रकमेचा लाभ मिळणार.अधिसूचनेच्या दिवशी गावात राहत असल्याचा पुरावा सादर केल्यास एकमुस्त रकमेचा लाभ देण्यात यावा. असे आदेशात स्पष्ट नमूद असतानासुध्दा प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे खंबीर नेतृत्व नसल्यामुळे व शासकीय अधिकाऱ्याचा मनमर्जी कारभार असल्यामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना इंदिरासागर प्रकल्प शाप ठरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळी येतात. शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत घोषणा देतात. पण त्यांच्या घोषणा हवतेच विरताना दिसतात. इंदिरा सागर प्रकल्पामुळे बाधितांना मोबदला न मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. भविष्यात प्रकल्पग्रस्तांनी मोबदला न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे काही शेतकऱ्यांनी पुनर्वसन अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी भंडारा यांनी वरील गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी प्रकल्पग्रस्तांची आर्त हाक आहे.