शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

पवनीला पर्यटन विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:39 IST

ऐतिहासिक महत्त्वाचे असलेले पवनी नगर प्राचीन व मंदिराचे शहर म्हणून ओळखले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसीत आहे.

ठळक मुद्देपालिका झाली १५० वर्षांची : ऐतिहासिक वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : ऐतिहासिक महत्त्वाचे असलेले पवनी नगर प्राचीन व मंदिराचे शहर म्हणून ओळखले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद अविकसीत आहे. विकासाला गती द्यायची असेल तर पवनी व परिसराचा पर्यटनक्षेत्र विकास हाच पर्याय उरलेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व आर्थिकदृष्ट्या अविकसीत असलेल्या नगरातील नगर पालिकेला १५० हून अधिक वर्षे झालेली आहेत.नगरात १५० पेक्षा अधिक मंदिर अद्यापही सुस्थितीत आहेत. त्यापैकी काही दुर्लक्षित आहेत. वैनगंगा नदी किनाºयावरील वैजेश्वर घाट, दिवाणघाट, ताराबाईचा घाट व पवनखिंड (खिडकी) असे महत्वाचे घाट आहेत. प्राचीन जवाहर गेट व परकोट आहे. ११ गरूड खांब आहेत. पुरातत्व विभागाने उत्खनन करून शोधलेले भव्य असे बौद्ध स्तुपाचे अवशेष आहेत. नगरात विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असे पंचमुखी सर्वलोभद्र गणेश आहे. सोबतीला महाकाय रांजीचा गणपती व धरणीधर गणेश सुद्धा आहे. दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात चंडीका माता, नदीकाठावर दुर्गा माता, गावातील मध्यवर्ती ठिकाणी एकविरा माता, कुºहाडा तलावालगत भंगार माता, कोरंभी रोडवरील टेकडीवर कालका व ज्वाला माता, जगन्नाथ मंदिर, दत्त मंदिर, मुरलीधर मंदिर, बालाजी मंदिर, वैजेश्वर मंदिर, निलकंठेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, राम मंदिर, धोबी तलाव, मारोती मंदिर, एकटांग्या हनुमान मंदिर, टेंभेस्वामीचे मंदिर, भूतेश्वर मंदिर आणि गधादेव मंदिर सुद्धा आहे. भगवान शंकराची पिंड असलेले कित्येक मंदिर नगरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जात आहेत. असे मंदिर अस्तित्वात आहेत. एवढा सगळा वैभव पवनी नगरात असूनही पर्यटनक्षेत्र म्हणून गावाचा विकास होवू शकला नाही.तालुक्यात गोसेखुर्द इंदिरा सागर धरण, उमरेड पवनी, कºहांडला वन्यजीव अभयारण्य स्थळ येथील महासभाधिभूमी असे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे स्थळ आहे. नगरात वर्षभर वेगवेगळ्या मंदिरात महाप्रसाद, भोजनदान, भजन कीर्तन व इतरही उत्सव सुरु असतात. परंतु सर्व पर्यटन क्षेत्राला एकसुत्रात बांधून त्यांचा विकास करावा असा दृष्टीकोण रुढ होवू शकला नाही. पवनीचा मागासलेपण अद्यापही कायम आहे. तालुक्याचे ठिकाण असले तरी दर्जेदार व उच्च शिक्षण मिळेल अशा शाळा महाविद्यालय नाही. तंत्रशिक्षणाची सोय नाही. वैद्यकीय शिक्षण तर नाहीच. पर्यटन व शिक्षण असे दोन पर्याय पवनी गावाला विकासाच्या वाटेवर घेवून जावू शकत असल्याने लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती ठेवून पवनीच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.