शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तभंगाचा अहवाल सादर सीईओंच्या आदेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 20, 2017 00:16 IST

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वादळ शमले न शमले तेच आयुक्तांनी या प्रकरणात दोषी पकडून पाच जणांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या हेतूने नोटीस बजावली होती.

प्रकरण आंतरजिल्हा बदलीचे : आयुक्तांनी बजावली पाच कर्मचाऱ्यांना नोटीसप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वादळ शमले न शमले तेच आयुक्तांनी या प्रकरणात दोषी पकडून पाच जणांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या हेतूने नोटीस बजावली होती. याप्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. आता केवळ या कर्मचाऱ्यांवर कुठली कार्यवाही होते, त्या आदेशाची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे यात पाचही कर्मचारी दोषी असल्याचे अहवालात नमूद असल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरणात अनियमितता झाल्याने प्रचंड वादग्रस्त ठरले आहे. या बदल्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप व नियमभंग करुन बदल्या प्रकरणी आदेश दिल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ ने सातत्याने वृत्त लिखान करुन प्रकरणाला तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे.या प्रकरणाची दखल घेवून आयुक्त अनुपकुमार यांनी चौकशी समितीच्या माध्यमातून अहवाल मागितला. यात तत्कालीन शिक्षणाधिकारी अभयसिंग परिहार, कक्षाधिकारी नलिनी डोंगरे, अधिक्षक रामभाऊ तरोणे, वरिष्ठ सहायक सुरेश येवले, वरिष्ठ सहायक तथा जि.प. उपाध्यक्ष स्वीय सहाय्यक मनिष वहाणे हे दोषी आढळून आले. याप्रकरणी या पाचही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला नोटीस बजावली. याप्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला असून या अहवालात हे पाचही कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदली प्रकरणात नियमभंग केल्याने दोषी आढळून आल्याचे नमूद केल्याची माहिती सुत्रांनी दिली. अहवाल सादर झाला असून यात त्यांच्यावर कारवाच्या अनुषंगाने कुठला आदेश होते. याकडे आता सर्वांचा नजरा लागल्या आहेत.