शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

विद्युत सहायक प्रशिक्षितांना न्यायाची प्रतीक्षा

By admin | Updated: November 23, 2015 00:38 IST

दहाव्या वर्गाच्या गुणांवर विद्युत सहायक पदाकरिता महावितरण विभागाने निवड केली. परंतु तांत्रिक पदाच्या भरतीकरिता तांत्रिक विषयाच्या गुणाक्रमे निवड व्हावी, ...

तुमसर : दहाव्या वर्गाच्या गुणांवर विद्युत सहायक पदाकरिता महावितरण विभागाने निवड केली. परंतु तांत्रिक पदाच्या भरतीकरिता तांत्रिक विषयाच्या गुणाक्रमे निवड व्हावी, याकरिता थेट उर्जा मंत्र्यापर्यंत निवेदन सोपविण्यात आले. परंतु अजूनपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने तालुक्यातील तांत्रिक बेरोजगार अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.सन २०१५-१६ या वर्षाकरिता तुमसर येथील विद्युत महावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक पदाकरिता प्रशिक्षित मुलांकडून अर्ज मागविण्यात आले होते. विद्युत सहाय्यक हे पद तांत्रिक पद असताना महावितरण विभागाने दहावी तसेच आय.टी.आय. उत्तीर्ण गुण विचारात घ्यायला हवे होते. परंतु महावितरण विभागाने तसे न करता केवळ वर्ग १० च्याच गुणांवर आधारित निवड प्रक्रिया उरकवून घेतली. त्यामुळे आय.टी.आय. मध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना डावलण्यात आल्याने तुमसर तालुक्यातील असंख्य उमेदवारांवर बेरोजगाराची टांगती तलवार लटकली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. सदर निवड भरतीत झालेला अन्याय दूर व्हावा, याकरिता तालुक्यातील बेरोजगार युवकांनी येथील स्थानिक आमदार व खासदारांकडे धाव घेतली होती. दरम्यान महाराष्ट्राचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता येथील तांत्रिक बेरोजगारांनी उर्जामंत्र्यांना निवेदन सोपवून घटना कथीत केली व संबंधितांना दहावी अधिक आय.टी.आय. चे गुण विचारात घेवून नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यासंबंधात आदेश निर्गमित करावे, अशीही मागणी केली होती. मात्र अजूनपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने तुमसर तालुक्यातील तांत्रिक बेरोजगारांवर उपासमारीचे संकट ओढावले असून त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)