शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

लाखनी तालुक्यातील गरजू लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

गतवर्षी तालुक्याला सुमारे दोन हजार घरकुल पुरविण्यात आले होते. या वर्षाला केवळ हजार ते बाराशे एवढ्याच घरकुलांची पूर्तता होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कित्येक पात्र व गरजू लाभार्थी ग्रामपंचायतीच्या शिफारशीनंतरही घरकुलाचा लाभ घेण्यात अपयशी ठरणार आहेत. घर बांधणे साधे नसल्याने गोरगरिबांना शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. शासनानेही गरिबांना घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचे आश्वासन केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना पुरविण्यात आले होते. २०२२ पर्यंत स्वतःला हक्काचे घर मिळणार, अशी आशा शासनाच्या माध्यमातून पुरविण्यात आली. त्यानुषंगाने सर्व्हे करून याद्यासुद्धा तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, अजूनपर्यंत गरजू  लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.गतवर्षी तालुक्याला सुमारे दोन हजार घरकुल पुरविण्यात आले होते. या वर्षाला केवळ हजार ते बाराशे एवढ्याच घरकुलांची पूर्तता होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कित्येक पात्र व गरजू लाभार्थी ग्रामपंचायतीच्या शिफारशीनंतरही घरकुलाचा लाभ घेण्यात अपयशी ठरणार आहेत. घर बांधणे साधे नसल्याने गोरगरिबांना शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. शासनानेही गरिबांना घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. महागाईच्या काळात प्रत्येकाला स्वतःचे घर बांधणे अशक्य आहे. शासन स्तरावरून वास्तव परिस्थितीचा अभ्यास घेऊन  ड यादीत समाविष्ट असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल देणे अत्यंत आवश्यक आहे.यापूर्वी ड  यादी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली होती. त्यात अनपेक्षितपणे दुरुस्त्या करून पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले होते. ती समस्या आजही कायम असल्याने पात्र लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित आहेत. ग्रामपंचायतीच्या शिफारशीनंतरही गरजू व पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारची ऑनलाइन व्यवस्था जोपर्यंत खुली होत नाही व त्यात बदल स्वीकारला जात नाही. तोपर्यंत ग्रामपंचायतीने किंवा पंचायत समितीने शिफारस केलेल्या लाभार्थ्याला घरकुल मिळणे कठीण असल्याची चर्चा आहे.ग्रामपंचायत स्तरावर घरकुलाचे नियोजन नसल्याने लाभार्थी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात द्वेष भावना वाढत आहे. लाखनी तालुक्याला सुमारे १०६६ एवढेच घरकुल आल्याचे चर्चेत आहे. लोकप्रतिनिधींकडेसुद्धा गावचे गरीब नागरिक घरकुलकरिता आग्रह धरीत आहेत. पालांदूर व परिसरातील कित्येक लाभार्थीसुद्धा पाच-दहा वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकार व राज्य शासन यांनी २०११ ला झालेल्या सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांना यथाशीघ्र घरकुल देण्याची मागणी पात्र लाभार्थी करीत आहेत.

बांधकाम साहित्याच्या किंमती गगनाला- शासनाकडून घरकुल बांधकाम करण्यासाठी अत्यल्प निधी सध्या मिळतो. सिमेंट, रेती, लोखंड, विटा व बांधकाम खर्च प्रचंड वाढला आहे. १ लाख ४५ हजार रुपये एवढा निधी शासनाकडून मिळतो. त्यासाठी तीन टप्प्यांत लाभार्थींच्या खात्यावर पवनी पंचायत समिती यांच्याकडून हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो. तसेच बांधकामावर पाणीखर्च म्हणून लाभार्थ्यांच्या खात्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्यातर्फे शासनाच्या पत्रकानुसार मजुरी खर्च मिळतो. 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना