शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ढिवरधुटी पर्यटनस्थळाला विकासाची प्रतीक्षा

By admin | Updated: August 7, 2015 00:47 IST

खापरी कोरंभीच्या घनदाट जंगलात ३० फूट उंच डोंगराच्या माथ्यावरून पांढऱ्या शुभ्र पडणाऱ्या जलधारा पाहून पर्यटकांना मोहून टाकणाऱ्या ढिवरधुटी ...

प्रवेशावर बंदी तर मिळू शकतो महसूलअशोक पारधी पवनीखापरी कोरंभीच्या घनदाट जंगलात ३० फूट उंच डोंगराच्या माथ्यावरून पांढऱ्या शुभ्र पडणाऱ्या जलधारा पाहून पर्यटकांना मोहून टाकणाऱ्या ढिवरधुटी या पर्यटनस्थळाचा समावेश उमरेड करांडलाच्या पवनी वन्यजीव अभयारण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे ढिवरधुटी या वर्षाकालीन धबधब्यावर जाण्याकरिता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.अभयारण्य विभागाने ढिवरधुटी या वर्षाकालीन पर्यटकांचा विकास केल्यास, पूर्व विदर्भातील एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून ढिवरधुटी नावारुपास येण्यास भरपूर वाव आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.पवनी पासून ९ किलोमिटर अंतरावर खापरी कोरंभीच्या डोंगरामध्ये धिवरधुटी हा नैसर्गिक धबधबा आहे. माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे लुप्त झालेले हे पर्यटनस्थळ जनतेच्या नजरेत आले. मागील सात वर्षात हजारो पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे. पर्यटकांनी या निसर्गरम्य परिसराचा स्वच्छंदपणे आनंद घेतला आहे. धिवरधुटी धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी असल्यामुळे जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दूरवरून येथे येत होते.३० फूट उंचीवरून धिवरधुटी सदृष्य खोलगट भागात पडणाऱ्या जलधारेचे दृष्य व सभोवताल असलेले डोंगर व त्यावरील वनराजी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. कोरंभी डोंगर महादेव मंदिरासमोर पायऱ्या चढत पोहचल्यानंतर डावीकडे जंगलात जाणाऱ्या मार्गाने काही अंतरावर उजवी काही अंतरावर उजवीकडे जंगलातील मलाई तलावाकडे जाणारा मार्ग आहे. या तलावाच्या पाळीवरून सुमारे तीन कि.मी. अंतरापर्यंत पायी चालत जावे लागते. धिवरधुटी पासून तलावापर्यंत वाहत आलेल्या झऱ्याचे ओढ्यात रुपांतर होते. तीन किलोमिटर पायी चालल्यानंतर आलेला थकवा धिवरधुटी मनोहारी निसर्गरम्य सौंदर्य पाहून नाहीसा होतो.परंतु ढिवरधुटी या पर्यटनस्थळाचा समावेश उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात करण्यात आला आहे. त्यामुळे या जंगलातील या पर्यटनस्थळाला भेट देण्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात ढिवरधुटी पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना प्रवेशबंदी केल्यामुळे धिवरधुटी पाहणाऱ्याहजारो पर्यटन प्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. अभयारण्य विभागाने धिवरधुटी चा विकास करून पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेश देण्यावर विचार केल्यास पूर्व विदर्भातील धिवरधुटी हे पर्यटनस्थळ म्हणून समोर येईल.