शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा

By admin | Updated: January 17, 2015 01:20 IST

करडी हे जंगलव्याप्त परिसरात असून वन्यप्राण्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

करडी (पालोरा) : करडी हे जंगलव्याप्त परिसरात असून वन्यप्राण्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. वनविभाग तुमसर यांनी नुकसानीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला. मात्र, दीड वर्षानंतरही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने त्यांच्यात रोष पसरला आहे.करडी परिसराला निसर्गाचे वरदान लाभले असले तरी हेच निसर्गाचे वरदान शेतकऱ्यांसाठी शाप ठरु पाहत आहे. कोका जंगल टेकड्याचे संरक्षित अभयारण्यात रुपांतर करण्यात आले. न्यू नागझीरा व्याघ्र प्रकल्प व कोका वन्यजीव अभयारण्यामुळे जंगलात वन्यजीवांच्या प्रमाणात तृणभक्षक तसेच मांसाहारी प्राण्यांची संख्या वाढली आहे. सांबर, हरिण, चितळ, निलगाय, रानम्हशी यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने अभयारण्याशेजारिल बफर झोनमध्ये त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. बफर झोनमधील शेत शिवारात वन्यप्राणयांचा उपद्रव वाढू लागला.जंगलापासून वैनगंगा नदीकाठापर्यंतची शेती उपद्रव्यामुळे धोक्यात आली आहे. मेहनतीने कसलेली शेती वन्यप्राण्यांच्या नुकसानीने मातीमोल होत आहे. शेतकऱ्यांनी या संबंधाने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना अनेकदा माहिती दिली. मात्र सोलर फेन्सिंग किंवा अन्य प्रमारची सुविधा अजुनही पुरविण्यात आलेली नाही. पालोरा, केसलवाडा, खडकी, डांगरदेव, बोंडे, ढिवरवाडा, जांभोरा, लेंडेझरी, किसनपूर, पांजरा, बोरी, बोरगांव, कान्हळगांव येथील शेतकरी वन्यप्राण्यांच्या हौदोसाने त्रस्त आहेत. उपरोक्त गावातील प्रकरणे तुमसर वन विभाग, कोका अभयारण्य यांचेकडे यांचे नुकसान भरपाईसाठी पाठविण्यात आलेली आहेत. मात्र दीड वर्ष लोटला असतांना नुकसान भरपाईचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या हाती पडलेला नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत असतांना विभागाकडून मदतीसाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. (वार्ताहर)