शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

१२.५० लाखांच्या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: January 31, 2016 00:36 IST

पालोरा गावात सन २०१३ पासून भीषण पाणी टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरु आहे. वादविवाद वाढीस लागले आहेत.

युवराज गोमासे करडीपालोरा गावात सन २०१३ पासून भीषण पाणी टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरु आहे. वादविवाद वाढीस लागले आहेत. ग्रामसभांमधून प्रश्न विचारले जात आहे. पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन बुजलेली असल्याने पाणी समस्या गावात आहे. सुमारे १२.५० लाखाचा प्रस्ताव जि.प. मधून मंजूर झालेला असून सिईओंच्या प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पालोरा गावातील पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन बुजलेली आहे. गावात पाण्याचे वितरण होण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सन २०१३ पासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास भटकावे लागते. अनेकदा समस्या गावकऱ्यांनी ग्रामसभेत मांडली, गावात पाण्याच्या समस्येवरून वादविवाद वाढीस लागले. परंतु प्रत्येक वेळी योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी १२.५० लाखांचा अंदाजपत्रक ग्रामपंचायतीने तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व जिल्हा पाणी पुरवठा समितीची मंजूरी मिळाली आहे. मात्र प्रस्तावाला अजूनही मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजूरी प्रदान केलेली नाही. ही वास्तव्य स्थिती आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या पाहता सीईओंनी तात्काळ प्रकरण मार्गी लावण्याची मागणी आहे.