शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

आंदोलन हिंसक होण्याची वाट पाहू

By admin | Updated: July 3, 2016 00:27 IST

विदर्भ राज्य आघाडीचे ध्येय केवळ विदर्भ राज्य मिळविणे हे असून हा लढा सरकारला त्यासाठी मजबूर करण्यासाठी आहे.

विदर्भ राज्य आघाडीची सभा : नीरज खांदेवाले यांचा इशाराभंडारा : विदर्भ राज्य आघाडीचे ध्येय केवळ विदर्भ राज्य मिळविणे हे असून हा लढा सरकारला त्यासाठी मजबूर करण्यासाठी आहे. आमचा हिंसक आंदोलनावर विश्वास नाही. कारण ही संतांची भूमी आहे. अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. परंतु प्रसंगी जनता रस्त्यावरही उतरू शकते. याची जाणीव सरकारने ठेवावी. तसेच सरकारने आमचे आंदोलन हिंसक होण्याची वाट न पाहता स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, असा सूचक इशारा विदर्भ राज्य आघाडीचे सचिव अ‍ॅड. नीरज खांदेवाले यांनी दिला.विदर्भ राज्य आघाडी, भंडारा जिल्हातर्फे सार्वजनिक वाचनालय, येथे आयोजित स्वतंत्र विदर्भ राज्यासाठीच्या जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, १ मे २०१५ रोजी या आघाडीची स्थापना अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.प्रा. अनिल जवादे म्हणाले, जनतेला संविधानीक अधिकार बहाल करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. परंतू आजपर्यंत सत्तेतील नेत्यांनी तसे होऊ दिले नाही. कारण त्यांना दर पाच वर्षांनी जनतेकडून मतांची भीक मागावी लागते आणि मतदार मताचे त्यांना दान करते हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी आपला अधिकार आणि आपल्या मताची किंमत व महत्व जनतेने समजून घेतले पाहिजे. शेतकरी नेते श्रीकांत तराळ म्हणाले, विदर्भाची मागणी जुनी असली तरी आजची परिस्थिती वेगळी आहे. सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भातील मामा तलावाच्य विकासाकरीता एकही पैसा खर्च केला नाही. परिणामी येथील शेती बिनभरोशाची झाली. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. श्रीहरी अणे यांचे हे आंदोलन अराजकीय स्वरूपाचे आहे आणि त्यामुळे सरकार तसेच राजकारण्यांमध्ये त्यांच्या नावाची धडकी भरली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते त्याविषयी सजग राहणे गरजेचे आहे. सरकारने राजकारणासाठी जनतेला वापरू नये तर राजकाण जनतेच्या हितासाठी करावे. सभेचे संयोजक रमाकांत पशिने यांनी तर संचालन केशव हुड यांनी केले. आभार अ‍ॅड. जयेश बोरकर यांनी मानले. यावेळी विदर्भ राज्यावरील स्वलिखित कविता कवी मार्कंड नंदेश्वर यांनी वाचले. जाहीर सभेसाठी अविनाश पनके, सुनिल जोशी, अ‍ॅड. अनंत गुप्ते, शशांक जोशी, भुमीपुत्र देवदास गभणे, अरविंद ढोमणे, मार्कंड नंदेश्वर यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी रमेश व्यवहारे, मार्कंड नंदेश्वर, अ‍ॅड. मधुकर वडेटवार, अरविंद ढोमणे, स.वा. मोहतुरे, रामदास महाकाळकर, रमेश तलदार, मधुबाला पशिने, मंजुषा बुरडे, गायत्री पंचबुद्धे, अनिता बोरकर, प्रितल बांते, धनराज सावठणे, विजय घोडमारे, शरद साकुरे, नरेंंद्र कटकवार, राहूल बडोले, खैरातीलाल, विजयकुमार दुबे, भा.श. जोगेकर, अशोक निमकर, गणेश धांडे, अ‍ॅड. सतीश ठवकर, प्रमोद काटेखाये, इंद्रकुमार राही, रमेश ढोमणे, विजय बडगुजर, साकोली येथील पदाधिकारी राकेश भास्कर, प्रविण भांडारकर, दिपक जांभुळकर, बाळू गिऱ्हेपुंजे, चंद्रकांत वडीचार, प्रविण डोंगरवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)