शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी प्रवाशांना दीड तास प्रतीक्षा

By admin | Updated: June 2, 2017 00:23 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर बसस्थानकावरून भंडारा जिल्हास्थळी जाण्यास ७.३० नंतर नऊ वाजता

सायंकाळी ७.३० नंतर ९ वाजता बस : तुमसरहून भंडाराला जाण्यासाठी गैरसोय लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर बसस्थानकावरून भंडारा जिल्हास्थळी जाण्यास ७.३० नंतर नऊ वाजता एक बस उपलब्ध आहे. तब्बल दीड तासांपर्यंत प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. नऊची बस दुसऱ्या आगाराची आहे. ती बस वेळेवर येत नसल्याने प्रतीक्षा करावी लागते. नागपूर विभागात नफा मिळवून देणारे क्रमांक दोनचे तुमसर आगार आहे. हे विशेष.भंडारा जिल्ह्यात तुमसर बसस्थानक क्रमांक दोनचे आगार आहे. दरवर्षी उत्पन्न मिळवून देण्यात तुमसर आगाराचा किमान दुसरा क्रमांक येतो. येथे बसगाड्या नियमित वेळेवर सुटत नाही. अशी ओरड शेकडो प्रवाशांची आहे. जिल्हा मुख्यालयी भंडारा येथे सायंकाळच्या सुमारास एकापाठोपाठ बसगाड्या आहेत. रात्री ८ नंतर केवळ रात्री नऊची बसगाडी आहे. तिही दुसऱ्या आगाराची बस आहे. तिची येण्याची निर्धारित वेळ नऊची असली तरी ती वेळेवर येत नाही. अनेकदा तिची बरीच प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागते. संध्याकाळी सहा नंतर ६.३० वाजता, संध्याकाळी ७.३० वाजता भंडारा येथेजाण्याकरिता बसगाड्या आहेत. रात्री ८ नंतर येथे बसगाडीची सुविधा नाही. ७.३० ची बस रात्री ८ वाजता सोडली तर प्रवाशांना रात्री नऊ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. परंतु त्याकडे तुमसर आगाराचे दुर्लक्ष दिसून येत आहे. केवळ अर्धा तास उशिरा बसगाडी सोडली तर नोकरीपेश लोकांना सुविधा उपलब्ध होईल. सायंकाळी एकापाठोपाठ बसगाड्या सोडण्यापेक्षा केवळ एक बस येथे उशिरा सोडण्याची गरज आहे. मागील अनेक दिवसांपासून येथे प्रवाशांची मागणी असूनही तुमसर आगार लक्ष देत नाहीत. शेवटी प्रवाशांच्या सेवेसाठीच बसगाड्या आहेत. त्यांना त्रास देण्यासाठी नाही. परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. तुमसर आगाराचे व्यवस्थापन नक्कीच चांगले आहे. स्पर्धेच्या युगात तुमसर आगाराने दरवर्षी नागपूर विभागात उत्पन्नात दुसरा स्थान पटकाविण्यात यशस्वी होत आहे. परंतु प्रवाशांच्या तक्रारीकडे येथे लक्ष देण्याची तितकीच गरज आहे. तुमसर आगाराला एसटी महामंडळाने नवीन गाड्या देण्याची येथे गरज आहे. दुसऱ्या आगारातील अनेक गाड्या तुमसरात दाखल झाल्या आहेत. काही बसगाड्यांचे आयुष्य संपले आहे तरी त्या रस्त्यावर धावत आहेत. तुमसर आगाराला किमान १० नवीन बसगाड्या देण्याची गरज आहे.संध्याकाळी भंडारा येथे एकापाठोपाठ जाणाऱ्या तीन बसगाड्या दुसऱ्या आगाराच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेत बदल मला करता येत नाही. परंतु प्रवाशी उपबल्ध असल्यास तशी विनंती संबंधित बसस्थानकांना करता येईल. प्रवाशांच्या सेवेसाठीच एसटी महामंडळ आहे.-नितीन उजवणे, आगार प्रमुख, तुमसर.